साहित्य:
बॅटरसाठी: १ कप बेसन, १ ते सव्वा कप आंबट ताक (किंवा दही आणि पाणी मिक्स), १/२ चमचा आलं-मिरचीची पेस्ट, चिमूटभर हिंग, १/४ चमचा हळद आणि चवीनुसार मीठ.
सारणासाठी: बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेले ओले खोबरे.
फोडणीसाठी: २ चमचे तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, बारीक हिरवी मिरची आणि पांढरे तीळ.
कृती:
१. एका बाऊलमध्ये बेसन, ताक, आलं-मिरचीची पेस्ट, हिंग, हळद आणि मीठ एकत्र फेटून घ्या. मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
२. हे मिश्रण कढईत मंद आचेवर सतत हलवत शिजवून घ्या (मिश्रण घट्ट होईपर्यंत).
३. मिश्रण गरम असतानाच एका ताटाच्या किंवा पोळपाटाच्या उलट्या बाजूला पातळ थरामध्ये पसरवून घ्या.
४. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यावर कोथिंबीर आणि ओले खोबरे पसरावे. नंतर सुरीने उभे काप करून त्याचे गोलाकार रोल (सुरळ्या) तयार करा.
५. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, मिरची, तीळ आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी द्यावी.
६. तयार झालेल्या फोडणीला सुरळीच्या वड्यांवरुन फिरवून घ्या.