देशभरात रविवारी कँडल मार्च, CJPची घोषणा; विद्यार्थी-पालकांसह समर्थकांना सहभागी होण्याचं आवाहन
esakal July 25, 2026 05:45 PM

जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू असून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मोठी घोषणा केलीय. देशात रविवारी २६ जुलै रोजी कँडल मार्च काढण्याचं आवाहन केलंय. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास देशभरात कँडल मार्च काढा आणि यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा असं अभिजीत दीपके यांनी म्हटलंय.

सीजेपीने समर्थकांसह विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सामान्य नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कँडल मार्च हा पूर्णपणे शांततेत आयोजित करण्यात यावा. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राज्यात कँडल मार्चचे आयोजन करून तुमचा पाठिंबा असल्याचं दाखवून द्या अशी विनंती सीजेपीने केलीय.

पोलिसांनी बॅरिकेड्स वेगवेगळ्या लेअरमध्ये उभारले आहेत. या बॅरिकेड्सना चेन आणि दोरखंडाने बांधण्यात आलंय. बॅरिकेड हटवायचे असतील तर एक एक हटवणं कठीण आहे. याशिवाय रस्त्यात लोखंडी प्लेट लावून त्याला बॅरिकेड्स जोडले आहेत. यामुळे आता आंदोलकांना अडवण्यात या बॅरिकेड्सची मदत होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.