Shriya Pilgaonkar: आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि उत्साहाचा सण आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूर गाठतात. या दिवशी अनेक घरांमध्ये उपवास, अभंग, भजन आणि विठ्ठल नामाचा जप सुरु असतो. याच वारीची आणि विठू भेटीची ओढ अभिनेत्री श्रिया पिळगांवकरला लागली आहे. श्रियाने त्यांच्या घरी आषाढी एकादशी कशी साजरी केली जाते, याबद्दलचा खास अनुभव शेअर केला आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रियाने सांगितले की, पिळगांवकर कुटुंबात आषाढी एकादशीला उपवास करण्याची परंपरा आहे. या दिवशी घरात साबुदाणा, राजगिरा, विविध फळे आणि उपवासासाठी बनवले जाणारे साधे, सात्विक पदार्थ खाल्ले जातात. काही जण निर्जला उपवासही करतात. मात्र तिच्या मते, उपवासाचा खरा अर्थ केवळ अन्नाचा त्याग नसून मनाला शांत करून प्रार्थना आणि आत्मचिंतनासाठी वेळ देणे हा आहे.
Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्कश्रियाने तिच्या आवडत्या अभंग आणि भक्तिगीतांचाही उल्लेख केला. संत तुकाराम महाराजांचा 'सुंदर ते ध्यान' हा अभंग तिला मनःशांती देतो, तर अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले 'माऊली' हे गाणे वारकरी परंपरेची भक्ती आणि समर्पणाची भावना सुंदरपणे व्यक्त करते, असे तिने सांगितले.
Atul Kulkarni: 'आजच्या परिस्थितीला आम्हीच जबाबदार'; जेन झीच्या आंदोलनाला प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा पाठिंबायावेळी श्रियाने तिची आई आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी दिलेल्या संस्कारांचीही आठवण सांगितली. लहानपणी आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण कुटुंब टीव्हीवर पंढरपूरची वारी पाहायचे, अभंग ऐकायचे आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व समजून घ्यायचे. सुप्रिया पिळगांवकर यांनी केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर त्यामागील श्रद्धा आणि अध्यात्म यांचीही ओळख करून दिल्याचे श्रियाने सांगितले.
पंढरपूरच्या वारीबद्दल बोलताना श्रिया म्हणाली की, लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात, हे दृश्य नेहमीच प्रेरणादायी वाटते. धर्मापेक्षा श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाने एकत्र आलेल्या भाविकांचा उत्साह मनाला स्पर्शून जातो. त्यामुळे आयुष्यात किमान एकदा तरी पंढरपूर वारीचा प्रत्यक्ष अनुभवण्याची मनापासून इच्छा आहे.