UltraTech Cement देणार प्रति शेअर 240 रुपये डिव्हिडंड, रेकॉर्ड तारीख अवघ्या काही दिवसांवर
ET Marathi July 25, 2026 05:45 PM
मुंबई : देशातील एक मोठी सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंट आपल्या भागधारकांना आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रति शेअर २४० रुपये अंतिम लाभांश देणार आहे. कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीख आता जवळ आली आहे. ही तारीख पुढील आठवड्यात आहे.
रेकाॅर्ड तारीख
अल्ट्राटेक सिमेंटच्या संचालक मंडळाने या अंतिम लाभांशाला एप्रिलमध्ये मंजुरी दिली होती. लाभांशासाठी ३० जुलै ही रेकाॅर्ड तारीख आहे. १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांची मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर लाभांशाचे वितरण केले जाईल. अल्ट्राटेक सिमेंटने आर्थिक वर्ष २०२५ साठी प्रति शेअर ७७.५० रुपयांचा केला आहे.
पहिल्या तिमाहीचे निकाल
अल्ट्राटेक सिमेंटचा एप्रिल-जून २०२६ तिमाहीसाठीचा निव्वळ एकत्रित नफा मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १७ टक्क्यांनी वाढून २,५९९.२८ कोटी रुपये झाला. मागील वर्षी नफा २,२२५.९० कोटी रुपये होता. कामकाजातून मिळणारा एकत्रित महसूल १६ टक्क्यांनी वाढून २४,६४८.२० कोटी झाला, जो जून २०२५ च्या तिमाहीत २१,२७५.४५ कोटी रुपये होता.
अलीकडेच, अल्ट्राटेक सिमेंटच्या संचालक मंडळाने विवेक अग्रवाल यांची पूर्ण वेळ संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी (चीफ मार्केटिंग ऑफिसर) म्हणून दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली आहे. त्यांचा कार्यकाळ १ जानेवारी २०२७ ते ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत असेल. ही पुनर्नियुक्ती अद्याप भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन आहे. अग्रवाल १९९३ मध्ये कंपनीत रुजू झाले असून ते ३० वर्षांहून अधिक काळ अल्ट्राटेक सिमेंटमध्ये कार्यरत आहेत.
शेअर्सची किंमत
शुक्रवार २४ जुलै रोजी बीएसईवर हा ११८३९.५५ रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजार भांडवल ३.४८ लाख कोटींहून अधिक आहे. शेअर्सचा ५२ आठवड्यांचाउच्चांक १३,१०४ रुपये आणि नीचांक १०,३२९ रुपये आहे. जून २०२६ च्या अखेरीस अल्ट्राटेक सिमेंटमध्ये प्रवर्तकांचा ५९.३३ टक्के हिस्सा होता.