पंढरपूरमध्ये पोलिसाची आत्महत्या
आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आले असता उचलले टोकाचे पाऊल
एसआरपीएफ जवानाने डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य
घटनेने पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तीमय वातावरण आहे. अशातच पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या पोलिसाने गोळी झाडून आयुष्य संपवलं. कामाच्या तणावातून या पोलिसाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास या पोलिसाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरमध्ये आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने आत्महत्या केली. डोक्यात गोळी झाडून घेत या पोलिसाने आयुष्य संपवलं. पंढरपुरमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसाने हे टोकाचे पाऊल उचललं. या घटनेने संपूर्ण पोलिस दलात एकच खळबळ उडाली. कामाच्या तणावातून जवानाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रामेश्वर ध्रुपद साबणे असे या पोलिसाचे नाव होते. तो मूळचा परभणीच्या गंगाखेड येथील रहिवासी होता.
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवलाही दुर्दैवी घटना आज पहाटे अडीज वाजताच्या सुमारास कासेगाव रोडवरील मुक्कामाच्या ठिकाणी घडली आहे. रामेश्वर साबणे हे संभाजी नगर येथे एसआरपीमध्ये जवान म्हणून कार्यरत होते होते. आषाढी यात्रेनिमित्ताने ते ३ ते ४ दिवसांपासून पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आले होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःच्या रिवाल्वर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. याबाबत स्थानिक पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
Akola Crime: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न; अकोला हादरले