Eknath Shinde: राजकीय घडामोडींना प्रचंड वेग, प्रधान यांचा राजीनामा होताच एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार; काहीतरी मोठं घडणार?
GH News July 25, 2026 06:13 PM

नीट पेपर फुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात लाखो विद्यार्थी सहभागी झाले. या तरुणांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजिनाम्यानंतर राज्यात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना होणार आहेत.

एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाऊन अमित शाह यांच्या भेट घेणार असल्याचे समोर आले आहे. दोन वाजून वीस मिनिटांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी आली. त्यानंतर लगेच वीस मिनिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली. अमित शाह यांचा फोन आल्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना झाले. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकंदरीत दिल्लीत घडत असलेल्या या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या असल्याचे म्हणावे लागणार आहे. आता अमित शाह यांच्या भेटीमध्ये काय होणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.