CJP Protest: प्रधान यांच्या राजीनाम्याचे दूरगामी परिणाम, आंदोलन यशस्वी का झाले? जाणून घ्या
esakal July 26, 2026 02:45 PM

विनोद राऊत

मुंबई : जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. १२ वर्षांच्या राजकारणातील केंद्र सरकारला बसलेला हा सर्वांत मोठा धक्का आहे. राष्ट्रीय राजकारणावर याचे व्यापक परिणाम होऊन दिशा बदलेल, असा राजकीय विश्लेषकांचा सूर आहे. यापुढे केंद्र सरकारला असंख्य आंदोलनांचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांनी एकहाती लढून जिंकलेले हे भारताच्या इतिहासातील एकमेव आंदोलन आहे, याकडे सुधींद्र कुलकर्णी यांनी लक्ष वेधले. यापूर्वी देशात आणीबाणीविरोधातील लढा सर्वांनी मिळून लढला होता. त्या आंदोलनाचे नेतृत्व जयप्रकाश नारायण या ७२ वर्षांच्या तरुणाने केले होते.

Mumbai News: म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना, ६ जणांची सुटका, १ जखमी आंदोलन का यशस्वी झाले?

आंदोलनाचा विषय महत्त्वाचा व मध्यमवर्गाच्या जिव्हाळ्याचा होता. त्यामुळे संपूर्ण देशाला या आंदोलनाशी जोडण्यात विद्यार्थ्यांना यश मिळाले. धर्म आणि जात विसरून हे आंदोलन उभे राहिले. जंतरमंतरवरील आंदोलनामुळे जेन झी पिढी आता राजकीयदृष्ट्या अधिक सजग झाली आहे, हा सर्वात महत्त्वाचा बदल असल्याचे सुमीत म्हसकर यांनी लक्षात आणून दिला.

पुढे काय ?

आंदोलनाचा धसका घेऊन यापुढे अशा स्वरूपाची आंदोलने सुरुवातीपासूनच उभी राहू नयेत, यावर केंद्र सरकारचा भर राहील. मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याच्या मोहिमेला अधिक वेग देईल. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अभिजित दीपके यांच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न विरोधक करू शकतात. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करणारे पक्ष बदलत्या परिस्थितीत निर्णयाचा फेरविचार करू शकतात.

Mumbai News: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेचा अहवाल गुलदस्त्यात, तीन आठवडे उलटले; पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह जगावरचे परिणाम

बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेती आंदोलने हिंसक स्वरूपाची होती. भारतातील जेन झी आंदोलन शांततामय झाले. त्याचे सकारात्मक परिणाम शेजारी राष्ट्रांवर पडतील, असे सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

एखादे आंदोलन मोडून काढण्यात भाजप नेतृत्वाला प्रथमच अपयश आले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने जेन झी पिढी राजकीयदृष्ट्या परिपक्व नागरिक बनत असल्याचे दिसून आले.

- सुमीत म्हसकर, राजकीय विश्लेषक

आंदोलनामुळे पंतप्रथान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. मोदी सरकार झुकत नाही, हा समज या आंदोलनामुळे खोटा ठरला आहे.

- डॉ. अमिताभ सिंह, प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

कितीही आंदोलने केली तरी काहीच बदल होत नाही, अशी एक निराशा समाजात पसरली होती. या आंदोलनामुळे आता आशेचा किरण दिसू लागला आहे.

- तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.