भिवंडी : टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीनंतर पोलिसांना महिनाभर गुंगारा देणाऱ्या मुख्य सूत्रधारास त्याच्या साथीदारासह भिवंडी पोलिसांनी पाटणा येथून अटक केली. मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता आणि त्याचा साथीदार इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकू अशी त्यांची नावे आहेत. दोघांना सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती भिवंडी परिमंडळाचे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, २८ जूनच्या महाराष्ट्र टीईटीपरीक्षेचा पेपर फुटला होता. हा पेपर विक्री करण्यासाठी महाराष्ट्रात काही जण येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी २७ जूनला तिघांना अटक करून कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी या गुन्ह्यात एकूण १२ जणांना अटक केली होती. त्यात बिजेंद्र गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता व साडू मिथुनकुमार सिंह यांच्यासह प्रिंटिंग प्रेसमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Mumbai News: म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना, ६ जणांची सुटका, १ जखमीया आरोपींच्या चौकशीतून बिजेंद्र गुप्ता हा या पेपरफुटीचा मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी बिहार, आग्रा, हरियाना येथे विविध पथके रवाना केली होती. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि विविध राज्यांतील तपास यंत्रणांशी समन्वय साधून हा शोध सुरू होता.
अखेर आरोपी बिहारमधील पाटणा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी पोलिसांनी बिजेंद्रकुमार गुप्ता व त्याचा साथीदार इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकू यांना ताब्यात घेत शनिवारी भिवंडीत आणले. मुख्य आरोपीच्या अटकेमुळे टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या गैरप्रकारामागील संपूर्ण साखळी, आरोपींची कार्यपद्धती आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतच्या तपासाला गती मिळणार असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी सांगितले. या वेळी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विजय मराठे, सचिन सांगळे उपस्थित होते.
Mumbai News: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेचा अहवाल गुलदस्त्यात, तीन आठवडे उलटले; पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह छापखान्यातील कर्मचाऱ्यांसोबत संगनमतआरोपी बिजेंद्रकुमार गुप्ता याचे आग्रा येथील 'महीम पत्रण' या छापखान्यातील कर्मचाऱ्यांसोबत आर्थिक हितसंबंध होते. महत्त्वाचे पेपर छापखान्यात येताच तेथील कर्मचाऱ्यांना पैशाचे प्रलोभन दाखवून पेपर विकत घेत होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिली. या प्रकरणात आणखी इतरही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरोपींनी हे पेपर नेमके कुणाला व कितीला विकले, तसेच ते कुठे कुठे विकले, याचा तपास होणे बाकी असून सखोल तपासानंतर ही माहिती समोर येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.