शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज विजय जल्लोष सभा आयोजित केली. दादरमधील वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंनी या जल्लोष सभेचे आयोजन केले होते. याची जोरदार तयारीही सुरू होती. मोठ्या प्रमाणात लोक या सभेत दाखल झाले. या कार्यक्रमात राज ठाकरे, अमित ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी त्यांनी सरकारवर जोरादार हल्लाबोल केला. दुसरीकडे मात्र एक मोठी घडामोड घडत होती.
शिवसेना (शिंदे गट) मधील मंत्री संजय शिरसाट यांनी थेट अभिजीत दीपके यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. अभिजीत दीपके याने (सीजेपी) कॉकरोज जनात पार्टीची सुरुवात केली होती. यानंतर या पार्टीने अनेक तरुणांना आकर्षित केले आहे. आता संजय शिरसाटांनी दीपकेच्या पालकांची भेट घेतल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.