अर्थमंत्री रुपयावर बोलेनात, राजनाथ देशाऐवजी धर्मेंद्रच्या संरक्षणाला, तर खड्डामंत्री...; ठाकरेंचा मोदींच्या मंत्र्यांना टोमणा
esakal July 26, 2026 04:45 PM

असनीट पेपरफुटी प्रकरणी कारवाई आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळालं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने मुंबईत शिवाजी पार्कवर तिरंगा जल्लोष मोर्चा काढत अभिनंदन सभा घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि सरकावर टीका केली. Uddhav Criticizes Modi Government at Shivaji Park

अंधभक्ताविरोधात देशभक्त जिंकले. आता संघर्षाची सुरुवात झालीय. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा असेल. मी भारतीय , देशभक्त आहे या एकाच भावनेनं या संघर्षात तुम्ही सहभागी झालात. एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांचं कौतुक केलं.

नवे शिक्षणमंत्री B.A पास , प्रल्हाद जोशींची संपत्ती किती? कोट्यवधींचे मालक तरी ना कार, ना बाइक मंत्री पक्ष फोडण्यात बिझी - उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदीजी, आतातरी देशाकडे लक्ष द्या, तुमचे मंत्री त्यांचे काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना देशाचं काम करण्यास सांगा. अर्थमंत्री निर्मला सीतारमण घसरणाऱ्या रुपयावर आणि महागाईवर बोलत नाहीत. पण पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत असं म्हणत ठाकरेंनी टोला लगावला.

राजनाथ सिंह, गडकरींना टोमणा

संरक्षण मंत्री राजनाथ शिंह यांनाही उद्धव ठाकरेंनी टोमणा मारला. ते म्हणाले की, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत. देशाच्या संरक्षणाची बोंब पण धर्मेंद्रच्या संरक्षणासाठी ते पुढे आले. तर दुसरीकडे खड्डामंत्री, सॉरी खड्डामंत्री नाही रस्ता मंत्री ते तर इथेनॉलवरती बोलत असतात. पुढचा नंबर नक्की आहे.

देशभर वणवा पेटला - उद्धव ठाकरे

मोदींना सांगायचंय की तुमच्या लाडक्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढताना जितक्या यातना झाल्या त्याहून कितीतरी जास्त यातना आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना झाल्यात. त्या यातना आम्ही विसरणार नाही. ही ठिणगी आता पडलीय. देशभर वणवा पेटलाय असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

जेनझींचे अभिनंदन - राज ठाकरे

जेनझींच्या आंदोलनाने झिंझ्या कशा उपटतात हे आंदोलनात दिसलं. हे आंदोलन पेटवल्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन अशा शब्दात राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच नीटच्या परीक्षा, पेपर फुटीचं झालेलं आंदोलन, त्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असं म्हणत राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांची नावं वाचून दाखवली. त्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.