सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके याच्या घरी जाऊन शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आई-वडिलांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना शिरसाट यांनी म्हटलं की, दीपके कुटुंबाशी आमचे नातेसंबंध आहेत. आंदोलनावेळी राजकीय वळण लागू नये यासाठी आलो नव्हतो. अभिजीतच्या प्रकृतीची विचारपूस केली. सरकार त्याची योग्य ती काळजी घेईल.
विरोधकांना सेलिब्रेशनला कायतरी कारण मिळालं, मोदीजींनी संवेदनशीलता दाखवून निर्णय घेतला : मुख्यमंत्री फडणवीसधर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांकडून सुरू असलेल्या सेलिब्रेशनवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांना सेलिब्रेशनला काही तरी कारण मिळालं, आम्हीही आनंदी आहोत. शेवटी जे असे प्रश्न असता ते व्यक्तीचे नसतात. हे तरुणाईचे प्रश्न आहे. त्यासंदर्भात मोदीजींनी संवेदनशिलता दाखवत जे काही निर्णय घेतले ते देशाचं हित समोर ठेवून घेतले. आता सोमवारी विधेयकही लोकसभेत मांडलं जाणार आहे.
CM Fadnavis on Delhi : दिल्लीला जाणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांची दिल्लीवारीवर पहिली प्रतिक्रियाशिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि जंतर मंतरवर आंदोलन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले होते. या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावर विचारलं असता त्यांनी म्हटलं की, मी आज नागपुरात, मी मुंबईला जाणार आहे. मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच आहे.
Uddhav Thackeray : अंधभक्ताविरोधात देशभक्त जिंकले, मोदीजी आतातरी देशाकडं लक्ष द्या : उद्धव ठाकरेअंधभक्ताविरोधात देशभक्त जिंकले, संघर्षाची सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध भारत हा संघर्ष आहे. मी भारतीय , देशभक्त आहे या एकाच भावनेनं या संघर्षात तुम्ही सहभागी झालात. एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. मोदीजी, आतातरी देशाकडे लक्ष द्या, तुमचे मंत्री त्यांचे काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत. त्यांना देशाचं काम करण्यास सांगा.
Mumbai News : नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजलीनीटच्या परीक्षा पेपर फुटीचं झालेलं आंदोलन, त्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असं म्हणत राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांची नावं वाचून दाखवली. त्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली.
Bihar Bandh : तेजप्रताप यादव यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी, कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखलनीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज विरोधात बिहारमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागलं. या प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेज प्रताप यादव यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय. त्यांच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
Thackeray Brothers Morcha : शिवाजी पार्कवर विजयोत्सव, तिरंगा हातात घेऊन तरुणाईची गर्दीविद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून मुंबईत विजयी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाजी पार्कसह रस्त्यांवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय. हातात तिरंगा घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पक्षाचा झेंडा घेऊन येऊ नये असं आवाहन ठाकरे बंधूंनी केलं होतं.
Mumbai News ठाण्यातून शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईकडे रवानाठाकरे बंधूंच्या संयुक्त तिरंगा विजय जल्लोषसाठी ठाण्यातून ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईकडे रेल्वे ने ठाणे स्थानक येथून रवाना... केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा दिल्यानंतर...आज मुंबईत 'ठाकरे बंधूं'ची संयुक्त तिरंगा विजय जल्लोष पाहायला मिळणार.... दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपर फुटी वर विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमार आणि केंद्र सरकारच्या विरोधात 'ठाकरे बंधूं'ची तोफ धडाडणार...
Sindhudurg : बाबा धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दीनिसर्गाच्या कुशीत असलेल्या बाबा धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी सिंधुदुर्गातील सर्वात उंच असणारा आंबोली जवळील कुंभवडेचा बाबा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. सह्याद्रीच्या कुशीतून फेसाळत कोसळणाऱ्या या धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. आज रविवार असल्यामुळे सांगली,कोल्हापूर, बेळगाव, गोवा तसेच सिंधुदुर्गातील पर्यटकांनी बाबा धबधब्यावर गर्दी केली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगात एक प्रशस्त गुहा आणि या गुहेच्या वरून साधारण २०० ते २५० फूट उंचीवरुन कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे.
Mumbai News : ठाकरे बंधूंचा आज मुंबईत तिरंगा विजयी जल्लोषठाकरे बंधूंचा आज मुंबईत महामोर्चा होणार आहे. दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाला पाठिंब्यासाठी सुरुवातीला मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तिरंगा विजयी जल्लोष मोर्चाचं आंदोलन करण्यात येत आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेतेही यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
Akola News शिंदेंच्या नेत्याच्या अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोपअकोल्यातील शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहसीन शेख यांचा मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. पक्षाचेच माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे. २२ जुलैला संध्याकाळी मोहसीन यांच्या दुचाकीला मागून चारचाकी वाहनाने धडक झाल्यानं मृत्यू झाला होता.
Kolhapur News अंबाबाई मंदिरातील गणेशाचे आसन पूजनश्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे अंबाबाई मंदिरातील खजिन्यावरील गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीचा गणेश उत्सव साजरा केला जातो. यंदाचे १३६ वे वर्ष असून, आषाढी एकादशीनिमित्त पाट (गणपती आसन) पूजनाने केली जाते. हे आसन पूजन चातुर्मास्यारंभाच्या सुरुवातीस आणि सर्वसाधारण गणेश उत्सवाआधी ५१ दिवस आसन कुंभाराकडे सोपविण्याची प्रथा श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने सुरू ठेवली आहे.
Bihar News नीट पेपरफुटी विरोधात आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण‘नीट पेपरफुटी’ आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘बिहार बंद’ला शनिवारी हिंसक वळण लागले. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत निदर्शने केली असून, अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.