FDA Action: तुकाराम मुंढेचा कारवाईचा धडाका! दिशाभूल करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त, १५ हून अधिक उत्पादनांवर बंदी
esakal July 26, 2026 04:45 PM

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थ पान मसाला, गुटखा विक्री, वितरण, वाहतूक विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. राज्यभरात अमली पदार्थ विक्रीसह सौंदर्य प्रसाधनांवरही कारवाईचा धडाका सुरु केला आहे. नुकतेच एफडीएने १५ हून अधिक सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनावर मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १५ हून अधिक सौंदर्य प्रसाधनांमध्ये पारा आणि शिशाचे धोकादायक प्रमाण आढळल्याने मोठी कारवाई सुरू केली आहे. ही उत्पादने निकृष्ट दर्जाची घोषित करण्यात आली असून, ती बाजारातून परत मागवण्याचे आणि त्यांची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ED Action: मुंबईत ईडीची मोठी कारवाई! रंगशारदा हॉटेलसह ३३२ कोटींच्या मालमत्ता जप्त, भूखंडाचाही समावेश

दरम्यान, एफडीएच्या मते, राज्यभरात विकल्या जाणाऱ्या अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये पारा आणि शिशाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे धडक कारवाई करत किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना या उत्पादनांची विक्री तातडीने थांबवण्याचे आणि सर्व उत्पादन बाजारातून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्वचेला गंभीर हानी पोहोचण्याचा इशारा

त्वचारोग तज्ञ डॉ. अजय दोदेजा यांनी स्पष्ट केले की, पारा आणि शिसे असलेल्या क्रीमच्या सततच्या वापरामुळे हे विषारी धातू शरीरात जमा होतात. सुरुवातीला, त्वचेची जळजळ, लालसरपणा, पुरळ, त्वचा पातळ होणे आणि रंग बदलणे ही लक्षणे दिसतात. कालांतराने मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेला गंभीर हानी पोहोचू शकते.

पेपरफुटीचा मास्टरमाइंड अटकेत! महिनाभर गुंगारा देणारे २ आरोपी पोलिसांच्या ताब्यात; TET पेपरफुटी प्रकरणातील मोठं नेटवर्क एक्सपोज ग्राहकांना आवाहन

एफडीएने (FDA) ग्राहकांना केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्राहकांना कोणतीही संशयास्पद किंवा अप्रमाणित सौंदर्य उत्पादने वापरणे टाळण्याचे आणि आरोग्याविषयीकोणतीही समस्या जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.