2028 ची निवडणूक लढविणार नाही कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
Marathi July 27, 2026 12:24 AM

टी. भा. प्रतिनिधी बेंगळूर
सध्याची राजकीय व्यवस्था अत्यंत दूषित झाली असून प्रामाणिक राजकारणाला काहीच किंमत उरलेली नाही, अशी खंत व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आगामी 2028 च्या विधानसभा निवडणुका न लढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंड्या जिल्ह्यातील के. आर. पेठ येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमात त्यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग साईट एक्स खात्यावर आपल्या निर्णयामागील कारणे सविस्तरपणे सांगितल्याचे स्पष्ट केले.

यापूर्वी निवडणूक लढविताना मतदारसंघातील लोक स्वेच्छेने पाठिंबा देत आपल्याला निवडून देत होते. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. परिस्थिती अशा टप्प्यावर आली आहे की, उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी स्वत: मतदारांना पैसे द्यावे लागत आहेत.

अशा दूषित वातावरणात प्रामाणिक राजकारण करणाऱ्यांना टिकून राहण्याची कोणतीही शक्मयता नाही. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पुढील निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. वऊणा मतदारसंघातील जनता पुन्हा निवडणूक लढवण्याची मागणी करत असली तरी आपण निवडणूक न लढवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत, असे त्यांनी सांगितले.

वय आणि आरोग्याची चिंता
आता आपले वय 79 असून सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपायला अजून दीड वर्ष बाकी आहे. 2028 पर्यंत आपले वय 81-82 वर जाऊन पोहोचेल. त्यावेळी आपले चांगले आरोग्य टिकवून ठेवू शकणार नाहीत. आतासारख्याच उत्साहाने काम करू शकणार नाहीत, असे वास्तव त्यांनी उघड केले आहे.

पाच दशकांचा राजकीय प्रवास
1978 मध्ये तालुका मंडळाचे सदस्य म्हणून आपण राजकारणात प्रवेश केला. 2028 पर्यंतच्या राजकीय जीवनात आपल्याला 50 वर्षे पूर्ण होतील. या प्रदीर्घ प्रवासात मी अनेक पराभव आणि विजय समानतेने स्वीकारले आहेत. तथापि, मी ज्या विचारधारेवर विश्वास ठेवला होता, तिच्या विरोधात मी कधीही गेलो नाही आणि माझ्या सदसद्विवेकबुद्धीशी विश्वासघात केला नाही, याचे मला खूप समाधान आहे, असे सिद्धरामय्या यांनी अभिमानाने सांगितले.

सक्रिय राजकारणात कायम
आपण केवळ निवडणूक राजकारणातून माघार घेत असल्याचे स्पष्ट केलेल्या सिद्धरामय्या यांनी, कायमस्वरुपी सक्रिय राजकारणात राहण्याचे वचन दिले आहे. गेल्या पाच दशकांपासून राज्यातील जनतेने आपल्यला आपले मानून प्रेमाने सल्ला दिला आहे. हे ऋण आपल्यावर आहे. येणाऱ्या काळातही लोकांच्या सुख-दु:खात आवाज बनून उभे राहत आपले उर्वरित आयुष्य पूर्णपणे लोकसेवेसाठी समर्पित करेन, अशी घोषणाही त्यांनी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.