Nashik Crime News : नाशिकच्या सटाणा (Satana Crime News) तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्येस (Nashik Crime News) प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीला विशेष पॉक्सो न्यायालयाने दोषी (Crime News) ठरवत विविध कलमांखाली कठोर शिक्षा सुनावली आहे. सुनील रामदास जाधव असे या आरोपीचे नाव असून मालेगाव येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने ही कठोर शिक्षा सुनावली आहे. पॉक्सो कायद्यातील गंभीर तरतुदींनुसार आरोपीला (Nashik Crime News) नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी, पीडिता, गर्भाचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. तज्ज्ञांच्या अहवालात आरोपी हाच गर्भाचा पिता असल्याचे स्पष्ट झाल्याने हा पुरावा न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाचा ठरलाय. (Satana Crime News)
Nashik Crime News : सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
दरम्यान, न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी सादर झालेला पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला दोषी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणामुळे नाशिकच्या सटाणा तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र गर्भाचा डीएनए जुळल्याने अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर कोर्टाने कठोर शिक्षा सुनावत जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.
Nashik Crime News : नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, नोव्हेंबर 2019 मध्ये सटाणा तालुक्यातील 13 वर्षीय पीडित मुलीवर आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. सातत्याने होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पीडितेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती. शवविच्छेदनाच्या दरम्यान तिच्या पोटात सात महिन्यांचा गर्भ असल्याचे निष्पन्न झाले. पीडिता जळाल्यामुळे गर्भाचाही मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. अशातच आरोपी, पीडिता, गर्भाचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. तज्ज्ञांच्या अहवालात आरोपी हाच गर्भाचा पिता असल्याचे स्पष्ट झाल्याने हा पुरावा न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाचा ठरलाय.
Nashik News : गोदावरी नदीला आलेली पूरस्थिती अजूनही कायम
गोदावरी नदीला आलेली पूरस्थिती अजूनही कायम आहे. गोदा काठावरील रस्त्यावर आजही पाणी आहे. दर बुधवारी याच गोदाकाठावर अनेक वर्षापासूनचा आठवडे बाजार भरत असतो. मात्र सध्या गोदावरी नदीला पाणी असल्यामुळे आठवडे बाजार भरणार का याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे
इतर महत्वाच्या बातम्या