'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 27, 2026 11:43 AM

Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra News) आपल्या तालावर खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). महाराष्ट्रातील प्रत्येकानं या कार्यक्रमावर आणि कार्यक्रमात झळकलेल्या प्रत्येकावर भरभरुन प्रेम केलं. तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, आजही हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमातले कलाकार आपल्या चाहत्यांना आपलेसे वाटतात. याच कार्यक्रमातील प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) यानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. 'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या पर्वातही कुशल बद्रिके झळकलेला. अशातच आता महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके (Actor Kushal Badrike) चाहत्यांना मोठं सरप्राइज देणार आहे. 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा मंच गाजवणार आहे. सोनी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पेजवरुन एक प्रोमो शेअर करण्यात आलाय. ज्यामध्ये कुशल बद्रिके हास्यजत्रेच्या कलाकारांसोबत स्टेजवर स्किट करताना दिसतोय. 
 
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये (Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra)

'चला हवा येऊ द्या'सोबतच अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये झळकणार असल्यामुळे चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. सोनी मराठीनं त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचा प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील कलाकार अरुण कदम (Arun Kadam), प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) आणि श्रमेश बेटकर (Shramesh Betkar) यांच्या विनोदाची जुगलबंदी दिसते. तितक्यात पुढे चाहत्यांना एक मस्त सरप्राइज मिळतं. एकदम स्टायलिश अंदाजात चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) फेम अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके एन्ट्री घेतो. 

कुशल आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यात धमाल संवाद रंगतो. पुढे कुशल आणि दत्तू मोरे यांच्यातही विनोदाची धमाल रंगत घडवून आणते. अशाप्रकारे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर कुशल बद्रिके स्कीटमध्ये दिसणार आहे. त्यामुळे चाहते भलतेच खूश झाले आहेत.  

 
 
 
 
 
View this profile on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कुशल बद्रिकेची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये एन्ट्री?

प्रोमो पाहून चाहते भलतेच खूश झाले आहेत. आता कुशल बद्रिकेची धम्माल कॉमेडी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये अनुभवायला मिळणार, या विचारानंच ते पुरते मोहरुन गेले आहेत. पण, जरा थांबा. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये कुशल बद्रिके झळकणार हे खरं आहे, तसेच, तो हास्यजत्रेच्या कलाकारांसोबत स्कीटही करणार आहे, हेसुद्धा खरं आहे. पण, आता तो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये नेहमी झळकणार हे मात्र खरं नाही. कारण प्रोमोमध्ये दिसतंय त्याप्रमाणे, कुशल बद्रिके त्याचा आगामी सिनेमा 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या प्रमोशनसाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पाहुणा म्हणून आलाय. यावेळी कुशलसोबतच त्याच्या सिनेमाचे दिग्दर्शक आणि इतर स्टारकास्टही आलीय. या सिनेमात संतोष जुवेकर, अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका असून विजू मानेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर सिनेमा 31 जुलै 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. 

Kushal Badrike On Rahul Deshpande: भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.