तिमाही निकालानंतर ब्रोकरेजचा मोठा निर्णय! SBI Life, NTPC सह 4 शेअर्सवर टार्गेट वाढवले, 61% पर्यंत कमाईची संधी
ET Marathi July 27, 2026 01:45 PM
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या (Q1FY27) निकालानंतर अनेक जागतिक ब्रोकरेज हाऊसने भारतातील प्रमुख शेअर्सवर आपली मते आणि टार्गेट प्राईस अपडेट केली आहेत. काही शेअर्समध्ये ६१ टक्क्यांपर्यंत वाढीची शक्यता वर्तवली गेली आहे, तर काही शेअर्सबाबत ब्रोकरेज अद्याप सतर्क आहेत. एसबीआय लाईफ, टाटा कन्झ्युमर, श्रीराम फायनान्स आणि एनटीपीसी यांसारख्या कंपन्यांमध्ये ब्रोकरेजने दाखवलेल्या विश्वासाचा हा सविस्तर आढावा.

१. एसबीआय लाईफ ब्रोकरेज व रेटिंग:
जेफरीज |Buy | टार्गेट २६०० रुपये,
यूबीएस |Buy | टार्गेट २४०० रुपये
सिटी (Buy - टार्गेट २७५० रुपये
संभाव्य परतावा: ५०% पर्यंत
एसबीआय लाईफ इन्शुरन्स ही भारतातील एक प्रमुख आणि आघाडीची खाजगी जीवन विमा कंपनी आहे, जी भारतीय स्टेट बँकेची संयुक्त कंपनी आहे.

२. श्रीराम फायनान्स ब्रोकरेज व रेटिंग:
एचएसबीसी | Hold - टार्गेट ११४० रुपये
नोमुरा |Buy - टार्गेट १२३५ रुपये
सीएलएसए |Accumulate - टार्गेट १२२० रुपये,
सिटी |Buy - टार्गेट १२२० रुपये
संभाव्य परतावा: २२% पर्यंत

Shriram Finance ही भारतातील एक मोठी नॉन-बैंकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) आहे, जी मुख्यतः व्यावसायिक वाहने आणि वैयक्तिक कर्जाचे पुरवठा क्षेत्र सांभाळते.

३. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ब्रोकरेज व रेटिंग:
नोमुरा | टार्गेट १४७५ रुपये
जेफरीज | टार्गेट १४५० रुपये
मॉर्गन स्टॅनली |Overweight - टार्गेट १३५१ रुपये
एचएसबीसी |Buy - टार्गेट १३९० रुपये
संभाव्य परतावा: ३५% पेक्षा जास्त

Tata Consumer Products ही टाटा समूहाची एफएमसीजी (FMCG) कंपनी असून ती चहा, कॉफी, मीठ, आणि इतर अन्न उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्रीत जागतिक स्तरावर अग्रेसर आहे.

४. एनटीपीसी ब्रोकरेज व रेटिंग:
मॅक्वेरी |Outperform - टार्गेट ४८० रुपये
सीएलएसए |Accumulate - टार्गेट ४५९ रुपये
संभाव्य परतावा: ३८% पेक्षा जास्त
NTPC ही भारत सरकारची सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) कंपनी असून ती औष्णिक, हायड्रो आणि नूतनीकरणक्षम ऊर्जेच्या निर्मितीत कार्यरत आहे.


(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.