'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 27, 2026 02:43 PM
Tejashree Pradhan On Veen Doghantli Hi Tutena Dialogue Free Episode: झी मराठीवरची (Zee Marathi) 'वीण दोघांतली ही तुटेना' (Veen Doghatli Hi Tutena) ही मराठी मालिका (Marathi Serial) सध्या तुफान गाजतेय. तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि सुबोध भावे (Subodh Bhave) स्टारर या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंय. सध्या कथानकात समर आणि स्वानंदी यांच्या नात्याला वेगळं वळण मिळताना दिसतंय. मालिकेतले समर आणि स्वानंदी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेत. अशातच आता मालिकेत वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळालेत. प्रेक्षकांची आवड आणि टीआरपीची गणित सांभाळत मालिकेत आजवर अनेक प्रयोग करण्यात आलेत, पण आता मालिकेत एक आगळा-वेगळा आणि कदाचित यापूर्वी कधीच न करण्यात आलेला प्रयोग करण्यात येणार आहे.  

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेंच्या सध्या तुफान गाजत असलेल्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत एक आगळावेगळा एपिसोड टेलिकास्ट केला जाणार आहे. या एपिसोडची खासियत म्हणजे, यामध्ये एकही डायलॉग असणार नाही. कलाकार एकमेकांशी संवाद साधणार नाहीत, तर फक्त खाणाखुणा करूनच आपलं म्हणणं एकमेकांना सांगणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांनाही या एपिसोडची उत्सुकता लागली आहे. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट करुन हा एपिसोड कधी टेलिकास्ट होणार? याबाबत विचारणा करत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तेजश्री प्रधानचं गृहिणींना खास आवाहन (Tejashri Pradhan On Dialogue Free Episode)

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली की, "हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस... माईक न लावता सेटवर काम करायला मिळालं, या भागात आम्ही मूकअभिनय केलाय. त्यामुळे प्रेक्षकांना एक आगळावेगळा एपिसोड पहायला मिळणार आहे. फक्त गृहिणींना एक सांगायचं होतं की, नेहमी गृहिणी जेवण बनवतानासुद्धा सिरिअल पाहतात. काम करताना त्या सिरियलमधील फक्त डायलॉग ऐकत असतात. पण, हा भाग संवाद विरहित असल्यानं गृहिणींना कामं आटपून पहावा लागेल... त्यामुळे मी सुद्धा हे सीन पाहण्यासाठी उत्सुक आहे..."

पुढे बोलताना तेजश्री प्रधान म्हणाली की, "आम्हाला हा भाग करताना फार मज्जा आली. मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी अनेक चांगली कामं केलीत. त्यामुळे हा ऐपिसोड करण्यासाठी कोणला वेगळी तयारी करावी लागली नाही. यामध्ये फक्त एकमेकांकडून बघून केलेले एक्स्प्रेशन्स आहेत. आम्हाला हे सीन करताना जशी मजा आली, तशीच तुम्हाला सुद्धा हा भाग पाहताना येईल..."

Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.