Abhinav Bisht Goes Viral in Internet: जंतर - मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach janta party) आंदोलन करुन आपल्या समाजात एक मोठा बदल आणण्याचा प्रयत्न केला आहे. जेन झींनी नीट पेपर फुटी प्रकरण आणि शिक्षण (Abhinav Bisht) व्यवस्थेतील काही त्रुटींबाबत आंदोलन करुन माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनस्थळी लाठीचार्ज करण्यात आला. इतकं सगळं होऊन सुद्धा जेन झी मागे हटला नाही. या आंदोलनातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. या सगळ्यात एका इन्फ्ल्युएंसरची बरीच चर्चा रंगली आहे. हा तरुण सध्या अनेक तरुणींचा नॅशनल क्रश बनला आहे. तो तरुण नक्की आहे तरी कोण? जाणून घेऊयात.
सीजीपीच्या आंदोलनात अनेक यंगस्टर्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. या फोटोत आणि व्हिडीओंमध्ये लोकांची क्रिएटिव्हिटी पाहायला मिळत होती. या प्रोटेस्टमध्ये अभिनव बिष्ट नावाचा इन्फ्लुएंसर खूप फेमस झाला. त्याने मित्रांसोबत आणि आंदोलनात उपस्थित असलेल्या जेन झींसोबत रिल तयार करुन शेअर केले होते. त्याने या आंदोलनात बरेच व्हिडीओ तयार केले होते. त्याच्या व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पडत होता.
'तेरी गलियों में मोहब्बत होगी' या गाण्यावर त्याने अनेक रिल्स तयार केले. तसेच सोशल मीडियात शेअर केले आहेत. त्याने या आंदोलनात बरेच व्हिडीओ तयार केले. पण त्याने जास्त रिल 'तेरी गलियों में मोहब्बत होगी' या गाण्यावर तयार केले होते. त्याच्या प्रत्येक रिल हजारांच्या लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. पण अभिनव बिष्ट आहे तरी कोण? तो रातोरात नॅशनल क्रश कसा झाला? जाणून घेऊयात.
View this post on Instagram
इन्फ्ल्युएंसर अभिनव बिष्ट याने बॉलिवूड गाणं 'तेरी गलियों में मोहब्बत होगी' या गाण्यावर बरेच रिल्स तयार केले. तसेच सोशल मीडियात शेअर केले. त्याच्या एका रिलला 150 मिलियन तर दुसऱ्या रिलला 152 मिलिअनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच्या व्हिडीओला सेलिब्रिटींच्याही लाइक्स मिळाल्या आहेत. 'तेरी गलियों में मोहब्बत होगी' हे गाणं आधी टिकटॉकवर ट्रेंड करत होतं. या गाण्यावर अनेकांनी रिल्स तयार केले होते. पण बघता बघता अभिनय बिष्ट हा मुलगा नॅशनल क्रश बनला आहे.
अभिनव बिष्टबाबत बोलायचं झाल्यास तो एक सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर आहे. त्याने आपल्या अकाऊंटवर बरेच फनी व्हिडीओज शेअर केले आहेत. अभिनव बिष्टचे इन्स्टाग्रामवर 574 kहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचे Issac IRLनावाने यूट्यूब चॅनेल देखील आहे. त्याचे यूट्यूबवर 6.93 लाख सब्सक्राइबर्स आहेत. अभिनव बिष्टने या आंदोलनात सहभागी होऊन अनेक व्हिडीओ तयार केले. ज्याचा त्याला फायदा झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या: