Ranbir Kapoor on Dhoom 4 Movie: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'रामायण' (Ramayan) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील रणबीर कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. रणबीर कपूर या सिनेमात भगवान राम यांची भूमिका साकारत आहे. तर, साऊथ सुपरस्टार यश हा या सिनेमात रावण यांची भूमिका साकारत आहे. गेल्या काही दिवसांपासून यश राज फिल्म्स यांच्या 'धूम 4'ची बरीच चर्चा रंगली आहे. रणबीर 'धूम 4' (Dhoom 4) या सिनेमाचा भाग असणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगली होती. पण आता या चर्चांना पू्र्णविराम मिळाला आहे. रणबीर कपूर या चर्चांवर नेमकं काय म्हणाला? (Entertainment) पाहूयात.
रणबीर कपूर सध्या 'रामायण' सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. तो अलिकडेच या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी सॅन डिएगो कॉमिक कॉन येथे गेला होता. त्याच्यासोबत नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी देखील उपस्थित होता. या दरम्यान, 'रिव्ह्यू नेशन'ला दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा म्हटले गेले की, यश आपल्या आगामी सिनेमा 'टॉक्सिक' सिनेमात झळकणार आणि रणबीर कपूर 'धूम 4'मध्ये दिसणार आहे. तेव्हा रणबीरने यावर त्वरित प्रतिक्रिया दिली.
रणबीर कपूरने यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'नाही. मी आता केवळ 'रामायण' आणि संजय लीला भंसाळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये झळकणार आहे. हा सिनेमा 21 जानेवारी 2027 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे', दरम्यान, रणवीर कपूरने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हे तरी स्पष्ट झालं की, तो 'धूम 4'चा भाग नाही. रणबीर कपूर 'धूम 4' या सिनेमाचा भाग नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी रणबीर कपूर 'धूम 4' या सिनेमाचा भाग असणार असल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली होती. 2024 साली एका मीडिया रिपोर्टने असा दावा केला होता की, येत्या काळात रणबीर कपूर यशराज फिल्म्स आणि आदित्य चोप्रा यांच्या 'धूम 4'मध्ये झळकणार आहे. त्याच्या रणबीर कपूरच्या चाहत्यांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली होती. बऱ्याच चर्चेनंतर रणबीर कपूरने या सिनेमासाठी होकार दिला असल्याचे वृत्त समोर आले होते. 2025 साली विक्की कौशल देखील 'धूम 4'चा भाग असणार असल्याची चर्चा रंगली होती. पण अद्याप याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
सीजेपीच्या आंदोलनात अभिनवची चर्चा, रातोरात झाला नॅशनल क्रश; 'तो' इन्फ्ल्युएंसर आहे तरी कोण?