Solar Industries सह 8 कंपन्यांचा डिव्हिडंड मिळवण्याची शेवटची संधी, शेअर्स आज खरेदी करा
ET Marathi July 27, 2026 03:45 PM
मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना चालू आठवड्यात लाभांशातून मोठ्या कमाईची संधी मिळणार आहे. एकूण ९० हून अधिक कंपन्यांच्या रेकाॅर्ड तारखा या आठवड्यात आहे. आज, २७ जुलै रोजी अनेक कंपन्यांचा लाभांश मिळवण्याची शेवटची संधी आहे. या कंपन्यांच्या लाभांशाची रेकाॅर्ड तारीख २८ जुलै आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आजच या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावे लागतील. आज शेअर्स खरेदी केला नाही तर लाभांश मिळणार नाही.

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड
रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने प्रति शेअर १० रुपये केला आहे. लाभांशाची रेकाॅर्ड तारीख २८ जुलै आहे. गुंतवणूकदारांना आज शेअर्स खरेदी करणे अनिवार्य आहे.


सोलर इंडस्ट्रीज इंडिया
संरक्षण आणि औद्योगिक स्फोटक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड प्रति शेअर ११ रुपये लाभांश देणार आहे.

डॉलर इंडस्ट्रीज
इनरवेअर आणि अपेरल सेगमेंटमधील सुप्रसिद्ध कंपनी डॉलर इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर ३ रुपये लाभांश देणार आहे. लाभांशाचा लाभ घेण्यासाठी भागधारकांसाठी २८ जुलै ही एक महत्त्वाची तारीख आहे.

ग्रीव्हज कॉटन लिमिटेड
ऑटोमोटिव्ह आणि अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी ग्रीव्हज कॉटन लिमिटेड देखील देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समाविष्ट आहे. कंपनीने प्रति शेअर २ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

जीएमएम फॉडलर लिमिटेड
ही आपल्या भागधारकांना प्रति शेअर १ रुपयांचा लाभांश देणार आहे. लाभांशाचा लाभ घेण्यासाठी कंपनीच्या भागधारकांसाठी २८ जुलै ही एक महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी रेकॉर्ड डेट आणि एक्स-डेट आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आज खरेदी करणे अनिवार्य आहे.

एसआरएफ लिमिटेड
रसायने आणि औद्योगिक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी एसआरएफ लिमिटेडने प्रति शेअर ५ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

मेनन पिस्टन्स लिमिटेड
ऑटो कंपोनंट कंपनी मेनन पिस्टन्स लिमिटेडने आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर १ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. लाभांशाच्या घोषणेनंतर गुंतवणूकदार कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकतात.

ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स

हॉस्पिटॅलिटी कंपनी ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडने प्रति शेअर ३.५० रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.