नारायणगाव : विघ्नहर सहकारी कारखाना ते येडगाव रस्त्यावरील गणेशनगर येथे पिकअप जिपची दुचाकी ला धडक बसून झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार प्रविण यशवंत गुंजाळ (वय 55 रा. बेल्हा, ता.जुन्नर ) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिकअप जीप चालक आकाश बाळू चव्हाण( रा. आळे ता. जुन्नर ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजता झाला.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.
प्रविण गुंजाळ हे मोटरसायकलवर बेल्हे बाजूकडून कारखान्याकडे जात होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकप जीपची मोटरसायकल धडक बसली. अपघातानंतर जीप मोटरसायकलवर पलटी झाली.
गंभीर दुखापत झाल्याने प्रविण गुंजाळ यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस हवालदार मंगेश लोखंडे करत आहेत.