थलपती विजयच्या 'जन नायगन'चा जलवा; 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा धडाका, सोमवारीही कोटींच्या घरात कमाई
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 28, 2026 01:13 PM

Thalapathy Vijays Jana Nayagan Film: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या 'जन नायगन'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ (Box Office Collection) घातला आहे.  ओपनिंग डेला या सिनेमाने जबरदस्त कमाई केली.  एच. विनोथ दिग्दर्शित या सिनेमात पॉलिटिकल अॅक्शन दाखवण्यात आलं आहे.  हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन 5 दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान अवघ्या 5 दिवसांत (Entertainment) या सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या सिनेमाने अवघ्या 5 दिवसांत बऱ्याच सिनेमांचे रेकॉर्ड्स मोडले.  विशेष म्हणजे या सिनेमाने 'करुप्पू' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईला मागे टाकत कॉलिवूड इंडस्ट्रीतील 2026 च्या पहिल्या आठवड्यात जास्त कमाई  करणारा सिनेमा ठरला आहे. 

थलपती विजयच्या 'जन नायगन'ने सोमवारी किती कोटींचा गल्ला जमवला? (Thalapathy Vijays Jana Nayagan Film Crosses 100 Crore)

पण या सिनेमाची खरी परीक्षा सोमवारी पार पडली. चित्रपटाने 5 व्या दिवशी किती कोटी रुपयांची कमाई केली? जाणून घेऊयात. थलपती विजय  यांचा हा सिनेमा त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा ठरला आहे. कारण त्यांचा आता राजकीय प्रवास सुरू झाला आहे. 'जन नायगन' हा सिनेमा 23 जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज झाला आहे.  दरम्यान, ओपनिंगला हा सिनेमा अपेक्षापेक्षा जास्त कमाई करु शकलेला नाही. पण हा सिनेमा  हळू हळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.   

'जन नायगन' या सिनेमाने पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग  केली. या सिनेमाने ओपनिंगला 42.70 कोटींचे कलेक्शन केले होते.  तर, दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 21.15 कोटी कमावले.  तिसऱ्या दिवशी या सिनेमाने  28.90 कोटींचे कलेक्शन केले.   तर, चौथ्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाने चौथ्या दिवशी  32  कोटी कमावले.    दरम्यान, पाचव्या दिवशी म्हणजेच सोमवारी या सिनेमाच्या कमाईत मंदी पाहायला मिळाली. 

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'जन नायगन' या सिनेमाने 5 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी 10.15 कोटींचं कलेक्शन केलं. मिडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने एकूण पाच दिवसांत 134.90 कोटींचं कलेक्शन केलं आहे.  तर, परदेशात पाचव्या दिवशी या सिनेमाने  4 कोटींचं कलेक्शन केलं आहे. दरम्यान, परदेशात एकूण पाच दिवसांत या सिनेमाने 75.50 कोटींचं कलेक्शन केलं आहे.  वर्ल्डवाईड कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास, या सिनेमाने एकूण पाच दिवसांत 233.24 कोटींचं कलेक्शन केलं आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.