बदलापूर : बदलापूर पश्चिमेतील बेलवली परिसरातील अय्यंगार बेकरीतून खरेदी करण्यात आलेल्या रवा केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा दावा नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी बदलापूर पूर्वेतील एका बेकरीत खारी ठेवलेल्या ट्रेमध्ये उंदीर फिरत असल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या पार्श्वभूमीवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) ठाणे विभागाने या बेकरींची तपासणी सुरू केली असून, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत.
Mumbai News: मुंबईच्या वस्त्यांमध्ये वाढते मजले, कमी होते सुरक्षिततेचे भान; दुर्घटनांचा धोका कायमराष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी बेलवली येथील बेकरीतून रवा केक खरेदी केला होता. तो त्यांच्यासह कुटुंबीयांनी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला. त्यांच्या दोन मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्नपदार्थांचे नमुने घेतले!केकमध्ये उंदराची विष्ठा असल्याचा संशय आल्यानंतर संबंधित बेकरीकडे तक्रार करण्यात आली; मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याचे हर्षाली गायकवाड यांनी सांगितले. संदर्भातील छायाचित्रे आणि इतर उपलब्ध पुरावे अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सादर केले आहेत. त्यानंतर एफडीएच्या ठाणे युनिटने संबंधित बेकरीवर छापा टाकून केकसह अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले.
Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर