BCCI announces India squad for Sri Lanka Test series : श्रीलंकेविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याचे पुनरागमन झाले आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी जोर लावेल. जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन संघात आहेत, परंतु त्यांच्या फिटनेस अहवालावर पुढील गणित अवलंबून राहणार आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकावे लागले आहे.
दरम्यान, जाहीर झालेल्या संघात उप कर्णधार म्हणूऩ लोकेश राहुलचे नाव दिसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रिषभ पंत हा प्रमुख यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून निवडले आहे, तर राखीव यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ध्रुव जुरेल संघात आहे. वॉशिंग्टनच्या जागी फिरकीपटू सारांश जैन याला संधी मिळाली आहे. श्रीलंकेच्या कसोटी संघात बरेच डावखुरे फलंदाज आहेत आणि अशात जैनची निवड महत्त्वाची ठरेल. श्रीलंका अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने दोन्ही डावात मिळून ६ विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या डावात नाबाद ७० धावांची खेळीही केली.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी : 15 ते 19 ऑगस्ट – गॉल
दुसरी कसोटी : 23 ते 27 ऑगस्ट – कोलंबो
जसप्रीतने इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतून दुखापतीमुळे माघार घेतली होती आणि त्याच्या तंदुरुस्तीवर या मालिकेत त्याची निवड अवलंबून होती. त्याची निवड झालीय, परंतु फिटनेस रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या खेळण्याबाबत स्पष्टता मिळेल. जस्सीच्या गैरहजेरीत जलदगती गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार यांच्या खांद्यावर असेल. फिरकीची जबाबदारी कुलदीप यादव, जडेजा, मानव सुथार व सारांश जैन सांभाळतील.
IND vs SL LIVE Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका फ्रीमध्ये कुठे पाहणार? TV चॅनेल आणि LIVE Streamingची संपूर्ण माहितीIndia’s squad for Tests against Sri Lanka: शुभमन गिल ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह*, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सुरांश जैन.