पोट चाकूने कापेन! धमकावत ६५ वर्षीय वृद्धाचा सख्ख्या बहिणींवर अत्याचार, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
esakal July 28, 2026 01:45 PM

Pimpri Chinchwad Crime: पुण्यात पिंपरी चिंचवड शहरात ६५ वर्षीय वृद्धानं ५ आणि १० वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. १० वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखायला लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे वाकड परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी वृद्धाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. Pimpri Police Arrest 65 Year Old in Minor Sisters Case

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका ६५ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले. रमजान बन्नूसाब बागवान (वय ६५) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईने तक्रार दिली. १० वर्षांच्या मुलीवर मे ते जुलै २०२६ या कालावधीत अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Kolhapur Sarpanch Killed : पंढरपूरच्या वारीचं आमिष अन् गोठ्यातच आवळला गळा; अनैतिक संबंधातून शिरगावच्या महिला सरपंचांचा खून, मृतदेह मुंबईतील समुद्रात टाकण्याचा कट उधळला

महिलेच्या घरात कोणी नसताना दहा वर्षीय मुलीला चाकूने पोट चिरण्याची धमकी देऊन आरोपीने अत्याचार केला. महिलेच्या चारवर्षीय मुलीशीही त्याने अश्लील वर्तन केले. मोठ्या मुलीने घरात आजीला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

घटना उघडकीस येताच पीडित मुलींच्या नातेवाईकांसह नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी करत वाकड पोलीस ठाण्यात गर्दी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय. दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचाराच्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.