PoK Election Violence: मतदानावेळी हिंसाचार; पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार, 9 जणांचा मृत्यू
GH News July 28, 2026 02:11 PM

पाकिस्तानातील ताब्यातील काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या वेळी हिंसाचार आणि गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तर बहुतेक मतदान केंद्रावर तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. काही ठिकाणी बॅलेट बॉक्स देखील जाळण्यात आल्या आहेत. या घटनांमुळे निवडणूक प्रक्रिया प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एका राजकीय कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचंही समोर आलं आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मीरपूर विभागाच्या 13 मतदारसंघात मतदान पार पडले. मतदान सकाळीच सुरू झालं. परंतु दिवसाअखेर अनेक हिसांचाराच्या घटना घडल्या. कोटली जिल्ह्यात दोन विरोधी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, भिंबर आणि कोटलीसहित अनेक भागात बॅलेट बॉक्स जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या व्यतिरिक्त मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याचाही आरोप करण्यात आला. तर काही परिस्थिती बिघडल्यानंतर मतदान काही वेळासाठी थांबवण्यात आलं. मतदानादरम्यान प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले. मतदारांना धमका

वल्याचाही आरोप करण्यात आला.पीपीपी नेत्यांनी निवडणूक आयोगाला हिंसाचार आणि सुरक्षा व्यवस्थेवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तर इतर राजकीय पक्षांनीही मतदानवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक नागरिकांच्या संघटनेनेही मतदान प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

एका राजकीय कार्यकर्त्याचा मृत्यू

कोटली जिल्ह्यात हिंसाचाराची देखील घटना घडली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने म्हटलं की, हिसांचारात पक्षाचा कार्यकर्ता मुख्तार यूनूसचा मृत्यू झाला. पक्षाने या हत्येला राजकीय विरोधकांना जबाबदार ठरवलं आहे. तर विरोधी पक्षांनी आरोप फेटाळून लावले आहेत. या व्यतिरिक्त पाकिस्तान पीपल्स पार्टीने या संबंधी निवडणूक आयोगालाही तक्रार दिला आहे. तसेच त्यांनी मीरपूरमध्ये शस्त्रधारी लोकांनी मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचाही आरोप केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.