उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 28, 2026 02:13 PM

Aai Tuljabhavani Marathi Serial Colors Marathi: देवशयनी एकादशीपासून (Ekadashi) सुरू होणारा पवित्र चातुर्मास हा केवळ व्रतांचा काळ नसून भक्ती, संयम, आत्मशुद्धी आणि सत्कर्मांचा एक दैवी कालखंड मानला जातो. याच पार्श्वभूमीवर कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani) मध्ये एका अत्यंत रंजक आणि भक्तिमय महापर्वाची सुरुवात होत आहे. जिथे सृष्टीचे पालन करण्यासाठी थेट आदिशक्ती तुळजाभवानीलाच मोठी (Colors Marathi) कसोटी पार पाडावी लागणार आहे. 

गुरुपौर्णिमा विशेष - दिव्य ब्रह्मचारिणी रूप (TuljaBhavani Takes The Brahmaharaini Avatar)

या विशेष पर्वाच्या कथानकानुसार, भगवान विष्णू योगनिद्रेत जाण्याच्या तयारीत असताना महादेवांचा ठावठिकाणा लागत नाही, ज्यामुळे सृष्टीच्या पालकत्त्वाची मोठी जबाबदारी आई तुळजाभवानीला आदिशक्तींकडून दिली जाते, आदिशक्तीच्या आशीर्वादाने ती भक्तांच्या रक्षणाचा संकल्प करते; मात्र भगवान विष्णु ही जबाबदारी देत असताना, तुम्ही या समयी मानवी देह धारण केला आहे. म्हणून देवी, तुम्ही या महान दायित्वासाठी पूर्णतः सिद्ध आहात का? हा प्रश्न विचारतात, जो तुळजा भवानी आईला ही अनपेक्षित असतो. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह येते. विष्णु असे का म्हणाले आणि चातुर्मासाचं उत्तरदायित्व तुळजाईची कसोटी ठरणार का? असा प्रश्न याने निर्माण होतो. 

दरम्यान याच काळात पाताळात एक मोठे कारस्थान रचले जाते. पाताळदेवी ही प्रत्यक्षात  अलक्ष्मी असल्याचे उघड होते, अलक्ष्मी, महिषासुर आणि शुक्राचार्य एकत्र येत भक्तांच्या मनातील श्रद्धा डळमळीत करण्याचा डाव आखतात. दुसरीकडे, गावातल्या समांतर कथेत, व्यसनातून मुक्त झालेला भिक्या आणि समाजाकडून 'अपशकुनी' ठरवली गेलेली त्याची मामेबहीण उषा हिच्या आयुष्यात मोठी वादळे येतात. मात्र, याच चातुर्मासाच्या पवित्र काळात तुळजाभवानी गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वात ब्रह्मचारिणी रूप धारण करते. तसेच उषाला 'सोळा सोमवार' व्रताचा मार्ग दाखवून तिच्या अध्यात्मिक प्रवासाला नवी दिशा देते. 

एकीकडे असुरांची देवीविरुद्धची महायुती आणि दुसरीकडे भक्तांचा उद्धार, अशा दोन्ही आघाड्यांवर आई तुळजाभवानी कशी पावले उचलणार, याची रंजक गाथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हा संपूर्ण प्रवास केवळ पौराणिक कथा नसून माणसाच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष, श्रद्धा आणि अंधश्रद्धेविरुद्धच्या लढ्याचे उत्तम प्रतीक ठरतो. चातुर्मासाच्या या पवित्र काळात संकटांवर मात करत भक्ती कशी अधिक दृढ करायची, याचे उत्तम मार्गदर्शन या मालिकेद्वारे प्रेक्षकांना मिळत आहे. भुजंग आणि पाताळदेवीचे कारस्थान निष्प्रभ करत आई तुळजाभवानी भक्तांचे रक्षण कशी करणार आणि महादेवांच्या ध्यानात आलेले आगामी संकट कसे टळणार, हे पाहण्यासाठी नक्की पाहा 'आई तुळजाभवानी', 'चातुर्मास पर्व' दररोज रात्री 8:50 वाजता, फक्त आपल्या कलर्स मराठीवर!

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.