Mrunal Thakur Dating Cricketer Yashasvi Jaiswal: बॉलिवूड (Bollywood News) आणि क्रिकेट (Sports News) या दोन्ही क्षेत्रांमधील चर्चा नेहमीच केंद्रस्थानी असतात. काही बॉलिवूड अभिनेत्रींशी (Bollywood Actress) दिग्गज क्रिकेटर्सनी लग्नगाठ बांधून संसार थाटला आहे. तर, कित्येकांच्या अफेअर्सचे किस्से आजही चर्चेत असतात. अशीच एक चर्चा सध्या रंगली आहे. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि टीम इंडियाचा धडाकेबाज धुरंधर एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातंय. खरं तर या दोघांना मुंबईतील एका कॅफेमध्ये एकत्र पाहिलं गेलं. दोघांचा कॅफेमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि चर्चांना उधाण आलं.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीम इंडियाचा दमदार बॅट्समन यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ वांद्र्यातील एका कॅफेमधील असल्याचं सांगितलं जातंय. या व्हिडीओमध्ये दोघेही एकाच ठिकाणी दिसतायत. पण, ना रोमँटिक अंदाजात आहेत आणि ना एकमेकांशी बोलतायत. तरीसुद्धा नेटकरी या दोघांबाबत जोरदार चर्चा करत असून दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं सांगितलं जातंय.
आम्ही ज्या बॉलिवूड अभिनेत्री आणि टीम इंडियाच्या बॅट्समनबाबत सांगतोय, ती म्हणजे, मृणाल ठाकूर आणि यशस्वी जायस्वाल.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं दिसतंय काय? (Mrunal Thakur Yashasvi Jaiswal Viral Video)
व्हायरल व्हिडीओमध्ये यशस्वी जायस्वाल एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसतोय, तर मृणाल ठाकूर अजूनही आतच आहे. या फुटेजमध्ये दोघांमध्ये कोणताही संवाद झाल्याचं पाहायला मिळत नाही. असं असूनही, अनेक फॅन पेजेसनी ही क्लिप शेअर केली आणि त्यासोबत त्यांच्यात काहीतरी नक्कीच सुरू आहे, अशा आशयाचे कॅप्शन्स दिलेत, ज्यामुळे काही तासांतच अफवा पसरल्या. ते दोघे 'डेट'वर होते, याला कोणतीही दुजोरा मिळालेला नाही आणि या चर्चांवर दोघांपैकी कोणीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
So... Yashasvi Jaiswal is dating Mrunal Thakur now? 😭💀
— Gaurav (@Gaurav_HRX) July 27, 2026
Didn't see that plot twist coming at all. Internet detectives are working overtime! 👀pic.twitter.com/y0lT2A5OgU
मृणाल ठाकूर, यशस्वी जायस्वाल खरंच डेट करतायत? (Mrunal Thakur And Yashasvi Jaiswal Really Dating?)
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन यशस्वी जायस्वाल अलिकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसलेला. या सीरिजमधल्या तिसऱ्या सामन्यात सेंच्युरी झळकावून त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं. पण, आता 24 वर्षांचा हा धडाकेबाज खेळाडू आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठ्या असलेल्या मृणाल ठाकूरसोबतच्या कथित अफेअरमुळे जोरदार चर्चेत आहे.
दरम्यान, 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, यशस्वी जायस्वाल टीम इंडियाच्या धडाकेबाज युवा क्रिकेटपटूंपैकी एक आहे. हा डावखुरा सलामीवीर 'इंडियन प्रीमियर लीग'मध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत नाबाद शतक झळकावून त्यानं नुकतीच सर्वांची मनं जिंकलेली. दुसरीकडे, मृणाल ठाकूर शेवटची वरुण धवन आणि पूजा हेगडे यांच्यासोबत 'हाय जवानी तो इश्क होना है' (Hai Jawani Toh Ishq Hona Hai) या सिनेमात दिसलेली.