नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. बँकेच्या एकूण २३ संचालक पदांपैकी तब्बल २१ जागा शेतकरी विकास पॅनलने ताब्यात घेतल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर खासदार अशोक चव्हाण यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी! अवघ्या १२ तासांत जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढजिल्हा बँकेच्या २३ जागांपैकी ११ जागांवरील उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १२ जागांसाठी रविवारी (ता. २६) मतदान झाले. मंगळवारी (ता. २८) मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. या १२ जागांपैकी १० जागांवर भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळविला. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार संगीता पाटील डक विजयी झाल्या असून, दुसऱ्या जागेवर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जळगावकर यांना केवळ एका मताने विजय मिळाला आहे.
मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार शेतकरी विकास पॅनलचे बी. आर. कदम, मारोती जाधव, विजयसिंह देशमुख, दत्तात्रेय रेड्डी, राजू जाधव, माधवराव जळगावकर, राजेंद्र केशवे, अनिल पाटील, रामचंद्र मुसळे आणि उकंडराव जाधव हे उमेदवार विजयी झाले. यापूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या ११ संचालकांसह शेतकरी विकास पॅनलची एकूण सदस्यसंख्या २१ वर पोहोचली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमरनाथ राजूरकर आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले. या प्रयत्नांतून २३ पैकी ११ जागा बिनविरोध करण्यात यश आले. मात्र, उर्वरित १२ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीतही शेतकरी विकास पॅनलने आघाडी कायम राखत १० जागांवर विजय मिळविला.
NEET Success Story: जिद्दीला यशाची साथ! साताऱ्यातील अथर्व बागलची ‘नीट’मध्ये ६३१ गुणांची दमदार कामगिरी; डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी झेपया निकालामुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खासदार अशोक चव्हाण यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.