कोल्हापूर : गुंड सूरज साखरे याचा ‘गेम’ करण्यासाठी महापालिका कंत्राटदार गणेश रमेश खाडे (रा. लक्षतीर्थ वसाहत) याने सुपारी दिल्याचे उघड झाले (Suraj Sakhare firing case update) आहे. महापालिकेत वडील रमेश खाडे यांच्याविरोधात प्रचारासह साखरेने आंदोलन करून रस्त्याचे काम बंद पाडल्याचा आर्थिक फटका बसला होता. याच रागातून ही सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले. हल्लेखोरांना एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन त्यांच्या अटकेनंतरची ‘सर्व जबाबदारी घेतो’ अशा शब्दही खाडेने दिल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले.
अधिक माहिती अशी, सूरज साखरेवर १६ जुलैला क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात गोळीबार झाला होता. याप्रकरणी शूटर रफिक मुल्ला व त्याच्या साथीदार शाहबाज मुल्ला याला अटक केली. या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले होते. त्यांच्यासह सुपारी घेणाऱ्या राकेश कारंडेसह पिस्तूल आणणारा दीपक विश्वकर्मा, यश खैरे यालाही न्यायालयासमोर हजर केले. या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
वडिलांविरोधात प्रचारसूरज साखरे याने महापालिका प्रभाग आठमधील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. याच भागात गणेश खाडे याचे वडील रमेश खाडे जनसुराज्य पक्षाकडून रिंगणात होते. यामध्ये खाडे यांचा पराभव झाला. खाडे यांच्या प्रचारातील अनेक मुद्दे खोडून काढण्याचे काम साखरे करत होता. याचा राग गणेश खाडेच्या मनात होता.
Shirgaon Sarpanch Killed : पतीचं दीड वर्षापूर्वी निधन, लग्नासाठी तगादा लावला म्हणून प्रियकरानं सरपंचाला संपवलं, रात्रभर कारच्या डिकीत मृतदेह ठेवून 500 किमीचा केला प्रवासगणेश खाडे हा महापालिकेतील रस्ते, बांधकामांची कंत्राटे घेतो. त्याने केलेल्या एका रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप करत साखरे याने काम बंद पाडले. याचा आर्थिक फटका खाडेला बसला होता. अशा वेगवेगळ्या कामांत वारंवार साखरेची उठाठेव सुरू झाल्याने त्याला संपविण्यासाठी खाडेने ही सुपारी दिल्याचे समोर आले.
एक लाख रुपये ॲडव्हान्स...सूरज साखरे याच्यावर गोळीबारासाठी गणेश खाडेने एक लाख रुपये ॲडव्हान्स दिली होती. राकेश कारंडे याने सुपारी स्वीकारल्यानंतर रफिक आणि आरबाजला हे काम सोपवले. गोळीबारानंतर दोघांना सोडविण्याची सर्व जबाबदारीही घेण्याचा शब्द खाडे याने दिला होता. साखरेचा गेम झाल्यानंतर नेमकी किती रक्कम मिळणार होती हे हल्लेखोरांनी अद्याप सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Kolhapur Sarpanch Killed : पंढरपूरच्या वारीचं आमिष अन् गोठ्यातच आवळला गळा; अनैतिक संबंधातून शिरगावच्या महिला सरपंचांचा खून, मृतदेह मुंबईतील समुद्रात टाकण्याचा कट उधळला आश्रयदात्यांवरही गुन्हे दाखल होणारगणेश खाडे दहा दिवसांपासून पसार झाला आहे. गुन्ह्यातील हल्लेखोरांसह पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी कारागृहात झाली. मात्र, खाडेचा थांगपत्ता लागलेला नाही. त्याला आश्रय देणाऱ्यांना, पैसे पुरविणाऱ्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
कोण आहे गणेश खाडे?गणेश खाडे हा महापालिकेचा नोंदणीकृत कंत्राटदार आहे. २०१० आणि २०१५ मध्ये त्याने स्वतः महापालिकेची निवडणूकही लढवली होती. परंतु, तो पराभूत झाला, तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्याच्या वडिलांना अवघ्या साडेतीनशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. महापालिकेतील आजी-माजी नगरसेवकांशी त्याची जवळची मैत्री असल्याने अनेक कामांचा ठेकाही त्यालाच मिळत होता.