पुणे : दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या तिघांना जाब विचारल्याच्या रागातून काका-पुतण्यावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना हडपसरमधील वेताळबाबा वसाहत परिसरात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
NEET Success Story: जिद्दीला यशाची साथ! साताऱ्यातील अथर्व बागलची ‘नीट’मध्ये ६३१ गुणांची दमदार कामगिरी; डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी झेपया हल्ल्यात सूरज रामा माने (वय २९, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) आणि त्यांचे काका लाला सोपान माने हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कनवरसिंग कालूसिंग टाक (वय २४), झलकसिंग त्रिलोकसिंग टाक (वय २४, दोघे रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) आणि मंगेशसिंग विजयसिंग जुनी (वय २६, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २७) दुपारच्या सुमारास सूरज माने, त्यांचा चुलत भाऊ अविनाश माने आणि समाधान माने हे वेताळबाबा वसाहतीत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आरोपी दारूच्या नशेत तेथे गोंधळ घालू लागले. याबाबत सूरज माने यांनी आरोपींना जाब विचारताच ते संतप्त झाले.
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी! अवघ्या १२ तासांत जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढयानंतर आरोपींनी सूरज माने आणि त्यांच्या काकांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. तसेच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.