वाहनधारकांसाठी आता एक मोठा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून घेण्यात येणार आहे. वाहनधारकांना दरवर्षी पीयूसी काढावी लागते. सध्या याची मुदत एक वर्षाची आहे. मात्र सरकारकडून मुदत वाढवून तीन वर्षे करण्याचा प्रस्ताव सरकारने दिला आहे. बीएस ६ गाड्यांच्या पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून ६ वर्षापर्यंत पीयूसी नोंदणी ३ वर्षापर्यंत वैध राहील. याबाबतच्या ड्राफ्टचे नोटिफिकेशन जारी केले आहे. Good News PUC Validity May Rise From One to Three Years
सहा ते १० वर्षापर्यंतच्या जुन्या बीएस ६ गाड्यांना दर दोन वर्षांनी पीयूसी नूतनीकरण करावं लागेल. तर १० वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांना दर सहा महिन्याला पीयूसी करावी लागणार आहे. नोटिफिकेशननुसार बीएस ४च्या निकषांचे पालन करण्यासाठी सर्व कारना दर सहा महिन्याला पीयूसी करावी लागेल.
'एक अधिकारी, एक कार', सरकारी ताफ्यावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; गैरवापर आणि खर्च कमी होणारबीएस १, बीएस २, आणि बीएस ३ गाड्यांना दर तीन महिन्यांनी त्यांचे पीयूसी नुतनीकरण करावं लागणार आहे. बीएस हे देशात वाहनांतून होणाऱ्या उत्सर्जन निकषांशी संबंधित आहे. यामाध्यमातून कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, हायड्रोकार्बन आणि पार्टिक्युलेट मॅटर यांच्या प्रदुषकांची पातळी निश्चित केली जाते. या मसुद्यावर सामान्यांकडून ३० दिवसात सूचना हरकती मागवण्यात आल्या आहेत.
बीएस ४ हे २०२७ ते २०२० पर्यंत लागू होते. तर बीएस ६ एप्रिल २०२० पासून लागू आहे. प्रदुषण नियंत्रणासाठी भारताने बीएस ५ वगळून थेट बीएस ६ स्वीकारले. ही वाहने कमी प्रदूषण करतात. यात कमी सल्फर असलेल्या बीएस ६ इंधनाची आवश्यकता असते. कारमधून, वाहनांमधून बाहेर निघणारा धूर निकषानुसार आहे की नाही यासाठी पीयूसी सर्टिफिकेट देण्यात येतं.