चॅटिंगचे पुरावेच केले सादर, सून गिरीजा राऊत यांच्या आरोपांवर विनायक राऊतांनी कोर्टात काय सांगितलं?
Tv9 Marathi July 28, 2026 11:45 PM

Vinayak Raut : ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरोधात त्यांचीच सून गिरीजा राऊत यांनी पोलिसात तक्रार केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून माझा छळ केला जात आहे. तसेच जादूटोण्याच्या नावाखाली मला त्रास देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. आता हेच प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विनायक राऊत यांनी न्यायालयात अटक पूर्व जमिनासाठी अर्ज दाखल केला होता. याच अर्जावर सुनावणी झाली. दरम्यान, या सुनावणीदरम्यान, अनेक धक्कादायक असे दावे करण्यात आले आहेत. विनायक राऊत यांच्यातर्फे त्यांच्या वकिलांनी व्हॉट्सअॅप चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट न्यायालयात सादर केले आहेत.

न्यायालयात सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं?

विनायक राउतात यांच्या एकूण 3 वकिलांनी युक्तिवाद केला. विनायक राऊत यांच्याकडून आपल्या मुलाचे आणि गिरीजा राऊत यांचे व्हाट्स ऍप चॅटिंगचे प्रिंटआऊट कोर्टात देण्यात आले. गिरीजा राऊत आणि गीतेश राउत अनेक देशात फिरायला गेले होते. त्याचेही पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. एफआयआरमध्ये जे काही नोंदवण्यात आले त्यात कुठेही जादूटोण्याचा विषय दिसत नाही, असा दावाही राऊत यांच्या वकिलांनी केला.

गीतेश यांना गिरीजा राऊत यांच्यासोबत राहायचं नसतं तर…

तसेच, गिरीजा राऊत तसेच राऊत कुटुंबीय ज्या वेळी बाबाकडे जायचे त्या वेळी गिरीजा यांचे वडीलही सोबत असायचे. गीतेश यांना गिरीजा राऊत यांच्यासोबत राहायचं नसतं तर मग ते दोघे बाहेर फिरायला का गेले असते? असा सवालही विनायक राऊत यांच्या वकिलांनी उपस्थित केला.

गिरीजा यांच्यासाठीदेखील मी दुवा मागितलेली

गिरीजा राऊत यांनी आरोप केल्यानंतर भोंदू बाबा काझी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या वकिलांनीही यावेळी न्यायालयात बाजू मांडली. मी मौलवी आहे. मी लोकांसाठी दुवा मागतो. गिरीजा यांच्यासाठीदेखील मी दुवा मागितलेली. गिरीजा राऊत यांच्या आई वडिलांच्या सांगण्यावरून मी हे केलं आहे, असा दावा बाब काझी यांनी त्यांच्या वकिलांच्या मार्फत केला. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.