MH-CETमध्ये पर्सेंटाईल घोटाळा? 40% मिळवणाऱ्याला 100 पर्सेंटाईल, 13 लाखांत हवं ते कॉलेज देण्याची हमी
Saam TV July 29, 2026 01:45 AM

MH CET Percentile Scam: महाराष्ट्रात NEET, TET आणि MPSC नंतर आता MH-CET (इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवेश परीक्षा) परीक्षेतही गैरप्रकारण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. आणि त्याला कारण ठरलयं... CET परीक्षेतील पर्सेंटाईल घोटाळा...इंजिनिअरिंग कॉलेजांतील प्रवेशासाठी घेतलेल्या CET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप आता राज्यभरातून होतोय..12वीत बोर्डाच्या परीक्षेत PCM गुपमध्ये केवळ 45 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला CET परीक्षेत 100 पर्सेंटाईल मिळत असल्याचा आरोप एका शिक्षकांनं केलाय. दरम्यान परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप होतोय.

136 विद्यार्थ्यांना PCMमध्ये 60 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळूनही 99 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळालेत. बारावीत 40-50% गुण असलेल्या 202 विद्यार्थ्यांना CETमध्ये 97+ पर्सेंटाईल मिळालेत. 100 पर्सेंटाईल मिळवलेल्या 7 विद्यार्थ्यांना 12वीच्या बोर्डात 60% पेक्षा कमी गुण मिळाले होते. या घोटाळ्याचं बिंग फोडणाऱ्य़ा पालक आणि क्लासचालकांच्या ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांचं CETपर्सेंटाईल 100 पर्यंत नेण्यासाठी क्लासचालकांनी 13 लाख रुपयांची मागणी केलीय. एवढंच नव्हे तर पर्सेंटाईल कमी असले तरी विद्यार्थ्यांना हव्या त्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात 14 लाख रुपयांत प्रवेश देण्याची हमी खासगी क्लासचालकांनी पालकांना दिलीय. CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी CET परिक्षेत घोटाळ्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दोन वेगवेगळ्या परीक्षांच्या गुणांची तुलना करणे चुकीचे असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Famous Actor Death: बॉलिवूडवर शोककळा! देव आनंद यांचे सुपुत्र अभिनेते सुनील आनंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एकीकडे CET सेलनं प्राथमिक स्तरावर आरोप फेटाळले असले, तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांचे अंतर्गत विश्लेषण करणार असल्याचं स्पष्टीकरणही दिलयं... तसचं याप्रकरणी पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आलीय..मात्र विद्यार्थ्यांची मूळ क्षमता आणि निकालातील ही तफावतीमुळे संशयाला जागा आहे.

Actress Death: ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेविश्वात हळहळ

आता या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून CET परिक्षेत घोटाळा झालाय का? CET परिक्षेचे पर्सेंटाईल वाढून देण्यासाठी पैसे घेणारे खासगी क्लासेसचे चालक कोण आहेत? याचा शोध घ्यायला हवा. अन्यथा घोटाळे आणि पेपरफुटीची ही वाळवी संपूर्ण शिक्षणव्यवस्थाच पोखरून टाकल्याशिवाय राहणार नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.