Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; शरद पवारांनी स्पष्टच फेटाळली चर्चा, दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्रच
esakal July 29, 2026 11:45 AM

बारामती : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पडदा पाडला. बारामतीत मंगळवारी (ता. २८) याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली.

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी! अवघ्या १२ तासांत जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढ

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेल्या एका बैठकीनंतर शरद पवार यांना पत्रकारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर प्रश्न विचारला असता, एका शब्दात शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली. गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले होते.

स्वतः शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट व इतर राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा सुरू होत्या. मात्र, आज शरद पवार यांनीच, ‘असे काहीही होणार नाही,’ असे स्पष्ट केले.

NEET Success Story: जिद्दीला यशाची साथ! साताऱ्यातील अथर्व बागलची ‘नीट’मध्ये ६३१ गुणांची दमदार कामगिरी; डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी झेप

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीबाबत अजून पंधरा दिवस थांबून शासन काय निर्णय घेते ते बघून मगच प्रतिक्रिया देऊ, असेही ते म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.