प्रियांका गांधी आणि प्रल्हाद जोशी: पेपरफुटी दुरुस्ती विधेयकावर संसदेत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी मंगळवारी लक्षवेधी भाषण केले. तब्बल नऊ तास या विधेयकावर (Paper Leak Bill) संसदेत चर्चा झाली. यावेळी प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी, अमित शाह, भाजप अशा सर्वांना लक्ष्य केले. यावेळी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देशाचे नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. तरुणांच्या आंदोलनानंतर बलात्काऱ्यांचे समर्थन करणारी व्यक्ती देशाच्या शिक्षणमंत्रीपदी (Union Education Minister) बसवण्यात आली, असे वक्तव्य प्रियांका गांधी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे खासदार प्रचंड संतापले. त्यांनी प्रियांका गांधी यांना प्रल्हाद जोशींबाबत जे वक्तव्य केले, त्याचा पुरावा द्या, असे आव्हान दिले. यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. (Parliament monsoon session 2026)
या सगळ्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्या जुन्या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. त्यांनी बिलकिस बानो बलात्कार (Bilkis Bano rape case) प्रकरणात हे वक्तव्य केले होते. बिलकिस बानो या महिलेवर 2002 च्या गुजरात दंगलीच्यावेळी (Gujrat Riots 2002) सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि तिच्या कुटुंबातील 14 जणांची हत्या करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 2024 साली या प्रकरणातील दोषींची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना कारागृहातून सोडले होते. यावरुन बराच वाद झाला होता. त्यावेळी प्रल्हाद जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करत बिलकिस बानोवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची सुटका योग्य असल्याचे म्हटले होते.
कैद्यांनी काही वर्षे तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर त्यांना चांगल्या वर्तणुकीच्या आधारे शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी तुरुंगातून सोडण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यानुसारच हा निर्णय झाला आहे. हा निर्णय एकट्या केंद्र सरकारने घेतलेला नाही. अशा अनेक घटना पूर्वी घडलेल्या आहेत, पण मला याबाबत बोलायचे नाही. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी हा निर्णय घेतला असेल तर मला त्यामध्ये काही चुकीचे वाटत नाही, हे कायदेशीर प्रक्रियेला धरुन आहे, असे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत प्रियांका गांधी यांनी प्रल्हाद जोशींवर संसदेत टीका केली होती.
आणखी वाचा
Nishikant Dubey on Nehru: ‘पंडित नेहरु रंगेल होते’, संसदेत भाजप खासदार निशिकांत दुबेंची जीभ घसरली
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द