दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी सहा वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा ७ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा होती. मात्र पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबली होती. रोहिणी नक्षत्रातील अनेक कामे रखडली असून दुबार पेरणीची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत होते.
महाबळेश्वर-मेढा रस्त्यावरील केळघर घाट सर्व वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनसातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर-मेढा-सातारा रस्त्यावरील केळघर घाटात काळा कडा ठिकाणी वारंवार दरड कोसळून दगड आणि माती रस्त्यावर येत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून आज २८ जुलै पासून हा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेतला असून जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रवाशांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा असे पत्रक काढण्यात आले आहे..
पर्यायी मार्ग
१) मेढा - मालदेव मंदिर - मार्ली - भिलार - महाबळेश्वर
२) मेढा - कुसुंबी - सह्याद्रीनगर - माचुतर - महाबळेश्वर
नीट पेपरफुटी प्रकरणात आज दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीसी बी आय ने दाखल केलेले दोषारोपपत्रात १३ आरोपींची नावे
सी बी आय च्या अर्थिक गुन्हे शाखेकडून दोषारोपपत्र न्यायालयासमोर ठेवले जाणार
यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल यांच्या नावांचा समावेश
शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, प्रल्हाद कुलकर्णी, तेजस शहा, डॉ. मनोज शिरुरे, शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे, मनीषा हवलदार यांच्या विरोधात सुद्धा दोषारोपपत्र सादर
अर्जुन आनंद यांची दिल्ली येथील राउज एवेन्यू कोर्ट मध्ये सुरू असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सी बी आय चे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
डिजिटल फॉरेन्सिक अहवाल, हस्ताक्षर तज्ञांची मतं आणि शैक्षणिक विभागातील तज्ज्ञांची मतं सी बी आय ने घेतले जाणून
ताम्हिणी घाट मार्ग गुरुवारपासून हलक्या व प्रवासी वाहनांसाठी सुरू होणारअतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेला ताम्हिणी घाटातील पुणे–कोलाड राष्ट्रीय महामार्ग (क्र. ७५३ एफ)
गुरुवारपासून हलक्या व प्रवासी वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिली.
पुण्यात होणार श्वान गणना! कुत्र्यांच्या मोजणीसाठी २५ लाख रुपयांची निविदा जारीपुणे शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, त्यांची संख्या दीड लाखाच्या पुढे गेली आहे. केवळ काही हजारांत कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया होत असताना आता पुणे महापालिकेने श्वानांची गणना करण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची निविदा जाहीर केली आहे. मागील वर्षी कुत्रा चावण्याच्या सुमारे ३० हजार ६१३ घटना घडल्या असल्याची माहिती आहे मात्र असं असतानाच आता भटक्या कुत्र्यांची संख्या मोजण्यासाठी २५ लाख रुपयांचे टेंडर जारी करण्यात आले आहे. या टेंडर ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये महापालिका हद्दीतील भटक्या व मोकाट श्वानांची गणना करण्यासाठी खाजगी संस्थेची नियुक्ती करणे, ऍप्लिकेशन विकसित करणे व त्याची गणना करणे असं निविदा जारी केली आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र नारायणपूर परिसरात वाहतूक नियमन; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनश्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वाहतूक नियमनाचे आदेश जारी केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर: लॉटरी लागलीय म्हणत वृद्धेला गंडा; तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास.छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्हाला लॉटरी लागली आहे असे सांगत एका ठगाने ६८ वर्षीय वृद्धेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. भगतसिंगनगर येथील कमल सुखदेव शिंदे या घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर दुचाकीवर बसवून राजधानी हॉटेल परिसरात नेले आणि 'लॉटरीचे पैसे मिळवण्यासाठी बांगड्या साहेबांना दाखवाव्या लागतील' असे सांगत हातातील तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेतल्या. बांगड्या हातात येताच ठगाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी कमल शिंदे यांच्या तक्रारीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री देणारा घोटाळासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री देणारा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्यापीठातीलच काही कर्मचारी बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्री करणारा रॅकेट चालवत असल्याची माहिती साम टीव्ही न्यूज च्या हाती लागली आहे.
Maharashtra News Live Update: - साईबाबांच्या शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साहसाईबाबांच्या शिर्डीत आज गुरूपोर्णीमेचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे.. साईबाबांना गुरूस्वरूप मानणारे हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले असून साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे.. तीन दिवस चालणा-या उत्सवाचा आज दुसरा आणि मुख्य दिवस असून देश विदेशातून आलेल्या भाविकांना आज साईबाबांचे दर्शन मिळावे यासाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे..
कर्जमाफीची पहिल्या यादीत 50 हजार शेतकऱ्यांची नावेकर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात या योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकेच्या एक लाख ६१ हजार १४८ शेतकऱ्यांची नावे पाठविण्यात आली आहेत. त्यांपैकी ५१ हजार शेतकऱ्यांच्या नावाची जिल्हा बँकेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आणि ५० हजार शेतकऱ्यांच्या नावाची राष्ट्रीयीकृत बँकांची पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात एक लाख एक हजार ४७० शेतकरी कर्जमुक्तीला पात्र ठरले आहेत.यामुळे राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा बँकेच्या ३७ हजार १८८ शेतकऱ्यांनीच आतापर्यंत आधार ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण केली. यादीत नाव जाहीर झालेल्या शेतकऱ्यांपैकी ६४ हजार २८२ शेतकरी या प्रक्रियेच्या दूर आहेत.