Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेसारख्या शुभ दिवशी या गोष्टी करायला विसरु नका…
admin July 29, 2026 01:24 PM
[ad_1]

Guru Purnima 2026 : हिंदू धर्मानुसार, आषाढी पौर्णिमेला महत्त्व देण्यात आलं आहे. या पौर्णिमेलाच ‘गुरुपौर्णिमा’ म्हणतात. गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हर्षी व्यासमुनींचा जन्म याच दिवशी झाला असे मानले जाते, त्यामुळेच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. आपल्या जीवनातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचे आभार मानन्याचा हा दिवस असतो. त्यामुळे जाणून घ्या या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे…

गुरुपौर्णिमेला करण्यासारख्या उत्तम गोष्टी:

गुरुंची पूजा : या दिवशी तुमच्या आई-वडिलांची, गुरूंची, शिक्षकांची, किंवा तुम्हाला योग्य मार्ग दाखवणाऱ्या इतर कोणत्याही मार्गदर्शकाची आराधना करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. तुमचे गुरू दूर असल्यास, त्यांना फोन करा किंवा संदेश पाठवून तुमची कृतज्ञता व्यक्त करा. गुरूंची कृपा जीवनातील विकासासाठी नवीन मार्ग उघडते.

भगवान विष्णू आणि महर्षी वेदव्यास यांची पूजा: हा दिवस महर्षी वेद व्यासांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. त्यामुळे, विष्णू आणि वेद व्यासांची पूजा करणं विशेष मानलं जातं. पूजेदरम्यान हळदीची फुले, चंदन आणि तुळशीची पाने अर्पण करावीत. “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि बुद्धी वाढते.

दान करा: गुरुपौर्णिमेला दान करणं सर्वात चांगली गोष्ट आहे. गरजू लोकांना जमेल तितकी मदत करा. अन्न, वस्त्र, फळे, धान्य, हळद, पुस्तके किंवा दक्षिणा द्या. सात्विक वृत्तीने केलेलं दान आर्थिक प्रगती आणि घरात शांती आणते.

धार्मिक ग्रंथांचा अभ्यास: मनःशांती आणि ज्ञानवृद्धीसाठी या दिवशी पवित्र धर्मग्रंथांचे वाचन करा. भगवद्गीता, श्रीमद्भागवत, रामचरितमानस किंवा इतर नीतिमूल्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केल्याने मनाला योग्य मार्गावर मार्गदर्शन मिळण्यास मदत होतं आणि मन देखील शांतं राहतं.

गुरु मंत्र किंवा इष्ट देवता मंत्राचा जप: जर तुम्हाला तुमच्या गुरूंकडून गुरुदीक्षा मिळाली असेल, तर त्यांनी दिलेला मंत्र भक्तिभावाने जपा. ज्यांच्याकडे गुरुमंत्र नाही, ते आपल्या आवडत्या देवतेच्या मंत्राचे ध्यान करू शकतात. मंत्रजपामुळे मानसिक एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो.

सात्विक अन्नसेवन आणि आत्मनियंत्रण: गुरुपौर्णिमेला पूर्णपणे सात्विक आहार घ्या. क्रोध, अहंकार आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. सर्वांशी गोड आणि नम्रपणे वागल्याने तुम्हाला गुरूंची कृपा प्राप्त होण्यास मदत होईल.

शिक्षणाशी संबंधित ज्ञान आणि वस्तूंप्रति आदर: हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे. आपल्या लेखणीची, पुस्तकांची, ज्ञानाशी संबंधित साधनांची पूजा आणि आदर करा. या शुभ दिवशी, नवीन अभ्यासक्रम, नवीन ज्ञान किंवा शिक्षणासंबंधी चांगले निर्णय घेणे अत्यंत शुभ मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

 

 

 


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.