शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही.. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची मोठी घोषणा, थेट..
Tv9 Marathi July 29, 2026 02:45 PM

कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकताच मोठी माहिती सांगितली. शेतकऱ्यांबाबत त्यांनी मोठी घोषणा केली. दत्ता भरणे यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना जी जी मदत करता येईल, ती मदत आम्ही करत आहोत. राज्यात 84 टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली. राज्यात खताचा साठा आपली जी मागणी आहे, त्याप्रमाणे उपलब्ध आहे. कुठेही शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. खताचा साठाही आपल्याकडे व्यवस्थित आहे. अजूनही पावसाची अपेक्षा आपण करत आहोत. पाऊस काही ठिकाणी कमी प्रमाणात झालेला आहे. पण निश्चितप्रकारे सर्व ठिकाणी पाऊस होईल, तसा आपला एक अंदाज आहे. कृषी विभागाच्या वतीने आपल्याला शेतकऱ्यांना जेवढे काही सहकार्य, मदत करता येईल. तेवढे करण्याचा प्रयत्न कृषी विभाग निश्चितपणे करतोय.

मका आणि सूर्यफुलाची पेरणी सर्वाधिक झाली. अहिल्यादेवींच्या नावाने राज्यभरात कर्जमाफी योजना आपण राबवत आहोत. आतापर्यंत 85 कंपन्यांवर कारवाई करण्यात आली. बियाणे बदलण्याचे आदेश दिले आहेत, असेही दत्ता भरणे यांनी म्हटले. शेतकऱ्यांना अजिबात घाबरण्याचे कारण नसल्याचे मोठे विधान दत्ता भरणे यांनी केले.

राज्यात यंदा मॉन्सून उशिराने दाखल झाला. जून महिना जवळपास कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. जोपर्यंत कृषी विभागाकडून सांगितले जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. आज राज्यात 84 टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, अजूनही काही भागात अपेक्षित पाऊस झाला नाही.

शेतकऱ्यांकडून पावसाची वाट बघितले जाते. यंदाच्या मॉन्सूनवर एल निनोचे संकट असल्याचे सांगितले जात होते. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. जून महिन्यात हवा तसा पाऊस झाला नसला तरीही जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पुढील काही दिवसात राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. दमदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.