पावसात घरात अडकला आहात? या क्रिएटिव्ह हॉबीजने बोरिंग दिवसही होईल खास!
Marathi July 29, 2026 08:26 PM

पावसाळा म्हटलं की गरमागरम चहा, खिडकीतून दिसणारी हिरवाई आणि पावसाच्या सरी… पण सततच्या पावसामुळे बाहेर पडणं शक्य नसलं की घरात बसून कंटाळा येणं स्वाभाविक आहे. अशा वेळी मोबाईलवर तासन्‌तास स्क्रोल करण्यापेक्षा एखादी नवीन आणि क्रिएटिव्ह हॉबी जोपासली, तर वेळही छान जातो आणि मनालाही सकारात्मक ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे या हॉबीजसाठी महागडी साधनंही लागत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया, पावसाळ्यात घरबसल्या करता येतील अशा काही भन्नाट क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीज.

1) रेन मॅक्रो फोटोग्राफी
पावसाचे थेंब निसर्गाला एक वेगळंच सौंदर्य देतात. तुमच्या स्मार्टफोनमधील मॅक्रो किंवा पोट्रेट मोड वापरून पानांवरील, फुलांवरील किंवा खिडकीच्या काचेवरील पाण्याचे थेंब कॅप्चर करा.

2. पाऊस कला चित्रकला
रिकाम्या कागदावर वॉटरकलरने साधं चित्र काढा. त्यानंतर काही क्षण हलक्या पावसाच्या सरी किंवा पाण्याच्या थेंबांचा स्पर्श होऊ द्या. रंग नैसर्गिकरित्या पसरून प्रत्येक चित्राला वेगळा आणि आकर्षक लूक मिळतो. ही एक उत्तम आर्ट थेरपीही ठरू शकते.

3. नेचर साउंड ट्रॅक
पावसाचे थेंब, पानांची सळसळ किंवा वाहणाऱ्या पाण्याचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा. हे वेगवेगळे ऑडिओ एकत्र करून स्वतःची ‘नेचर साउंड ट्रॅक’ तयार करा. तणाव कमी करण्यासाठी किंवा शांत झोपेसाठी हा नैसर्गिक आवाज खूप उपयोगी ठरू शकतो.

4. मान्सून जर्नल
दररोज पावसात दिसलेली एखादी सुंदर गोष्ट, दिवसातील खास आठवण किंवा मनातले विचार एका वहीत लिहून ठेवा. काही दिवसांनी हेच जर्नल वाचताना पावसाळ्याच्या सुंदर आठवणी पुन्हा अनुभवता येतील.

5. DIY टेरेरियम
काचेच्या बरणीत छोटे दगड, माती, मॉस आणि लहान रोपं वापरून मिनी गार्डन तयार करा. घराच्या सजावटीसोबतच ही हॉबी मनालाही ताजेतवाने ठेवते.

6. बुक कॅफे कॉर्नर
घरातील एका कोपऱ्यात आरामदायी खुर्ची, आवडतं पुस्तक आणि गरम कॉफी किंवा चहा घेऊन स्वतःसाठी छोटंसं ‘बुक कॉर्नर’ तयार करा. पावसाळा वाचनाची आवड वाढवण्यासाठी सर्वोत्तम ऋतू मानला जातो.

या हॉबीजचे फायदे
– मानसिक तणाव कमी होतो.
– सर्जनशीलता वाढते.
– स्क्रीन टाइम कमी होतो.
– नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळते.
– मूड फ्रेश राहतो आणि वेळेचा सदुपयोग होतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.