Mulank News : कामाच्या ठिकाणी मिळणारी पगारवाढ किंवा व्यवसायातील यश केवळ कठोर परिश्रमांचा भाग नसून, त्यामागे जन्मतारखेची एक अदृश्य ऊर्जा काम करत असते.
अंकशास्त्रातील करिअर न्यूमरोलॉजी (Career Numerology) या रहस्याचा उलगडा करते, ज्यामुळे काही लोक सहजपणे यशाच्या पायऱ्या चढतात. चला जाणून घेऊया अशा कोणत्या खास जन्मतारखा आहेत, ज्यांच्यावर लक्ष्मी आणि कुबेराची विशेष कृपा असते.
मुलांक ५अंकशास्त्रात मुलांक ५ (५, १४, २३ तारखेला जन्मलेले) हे संवादकौशल्यामुळे नोकरीत वरिष्ठांचे मन जिंकून पगारवाढ मिळवण्यात आघाडीवर असतात.
त्यांच्या जोडीला मुलांक ३ (३, १२, २१, ३० तारखेला जन्मलेले) हे गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी सल्लागार म्हणून चमकतात, ज्यामुळे त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त पॅकेज मिळते
Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास मुलांक १मुलांक १ (१, १०, १९, २८ तारखेला जन्मलेले) हे सूर्याच्या तेजामुळे जन्मतःच लीडर असतात आणि कामाप्रती निष्ठेमुळे त्यांना मोठी पगारवाढ मिळते.
तसेच शुक्राच्या प्रभावामुळे मुलांक ६ (६, १५, २४ तारखेला जन्मलेले) असलेले लोक मीडिया किंवा ग्लॅमर क्षेत्रात प्रचंड ऐश्वर्य आणि आर्थिक यश मिळवतात.
Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर मुलांक ८मुलांक ८ (८, १७, २६ तारखेला जन्मलेले) असलेल्या लोकांच्या करिअरमध्ये सुरुवातीला चढ-उतार असतात
परंतु शनीच्या प्रभावामुळे तिशीनंतर नशीब पालटते आणि त्यांना अपेक्षेपेक्षा खूप मोठी पगारवाढ मिळते. हे लोक रिअल इस्टेट किंवा मोठ्या व्यवस्थापनात कोट्यवधींचे साम्राज्य उभे करतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.