नेल एक्सटेंशन काढताना घ्या ही काळजी, नाहीतर होईल नुकसान
Marathi July 29, 2026 11:25 PM




सुंदर आणि लांब नखांसाठी आजकाल नेल एक्सटेंशन (Nail Extensions) करण्याचा ट्रेंड महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. यामुळे नखे लांब दिसतातच शिवाय आणखीनच आकर्षक वाटतात. बऱ्याच महिला नेल एक्सटेंशन करून झाल्यावर घरीच काढण्याचा प्रयत्न करतात. परंतू हातांचे सौंदर्य वाढवणारे हे नेल आर्ट जितके आकर्षक दिसते, तितकीच ते काढताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. थोडीशी निष्काळजीपणा तुमच्या नखांचे कायमचे नुकसान करू शकते. म्हणूनच, घरच्या घरी किंवा पार्लरमध्ये नेल एक्सटेंशन काढताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ते जाणून घेऊया. Nail extension removal

बनावट नखे काढताना हळुवार काढणे गरजचे आहे कारण नेल एक्सटेंशन करताना नखांना गोंद लावला जातो. अशावेळी तुम्ही जर बनावट नखे जास्त वेगाने काढण्याचा प्रयन्त केल्यास तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. अनेकदा बनावट नखे काढण्यासाठी महिलावर्ग धारदार वस्तूंचा वापर करतात, पण असे करणे योग्य नाही.

कसे काढाल?

  • एक्सटेंशन काढण्यासाठी 100% शुद्ध ॲसिटोन वापरा.
  • प्रथम एक्सटेंशनचा वरचा शाईनी थर फाईल करून थोडा घासून घ्या.
  • कापसाचा गोळा ॲसिटोनमध्ये भिजवून नखावर ठेवा आणि त्यावर ॲल्युमिनियम फॉइल घट्ट गुंडाळा.
  • 20 मिनिटे तसेच राहू द्या, ज्यामुळे ॲक्रेलिक किंवा जेल डिझाइन मऊ पडेल आणि सहज निघेल.
  • ॲसिटोनमुळे नखे आणि आजूबाजूची त्वचा अत्यंत कोरडी पडते.
  • एक्सटेंशन पूर्णपणे काढल्यानंतर हात स्वच्छ धुवून नखांवर क्युटिकल ऑइल किंवा खोबरेल तेल लावून हलका मसाज करा.
  • चांगला मॉइश्चरायझिंग हँड क्रीम वापरा.
  • जर एक्सटेंशन खूप घट्ट असतील किंवा स्वतः काढताना वेदना होत असतील, तर घरगुती प्रयोग न करता नेल आर्ट पार्लरमध्ये जाऊन तज्ज्ञांकडूनच ते काढून घ्यावेत.

हेही वाचा – Beauty Products : फ्रिजमध्ये ठेवू नयेत ‘हे’ ब्युटी प्रॉडक्ट्स



© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.