पुरुषांच्या 100 मीटर टी-47 फायनलमध्ये भारतीय धावपट्टूंनी अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन केले. शर्यतीदरम्यान दिलीप गावीत एका टप्प्यावर चौथ्या क्रमांकावर घसरला होता. मात्र, अखेरच्या काही सेकंदांत त्याने दाखवलेला जबरदस्त वेग सर्वांना थक्क करणारा ठरला. दिलीप गावीतने 10.71 सेकंदाची वेळ नोंदवत थेट पहिले स्थान पटकावले आणि सुवर्ण पदक आपल्या नावे केले. याच शर्यतीत भारताच्या मोहम्मद बासिल एम यानेही उत्तम कामगिरी केली. त्याने 10.83 सेकंदाच्या वेळेसह रौप्य पदक जिंकले. इंग्लंडच्या केविन सँटोसला मागे टाकत बासिलने दुसरे स्थान मिळवले.
MOMENT OF THE DAY FOR US! 🇮🇳🥹
— The Khel India (@TheKhelIndia) July 29, 2026
Dilip Gavit & Mohammad Basil won the respective Gold & Silver in 100m T47🥇🥈 pic.twitter.com/T7I9LtQqgV
दिलीप आणि बासिलच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या काही मिनिटे आधीच पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकरने भारतासाठी रौप्य पदक निश्चित केले. मुरलीने 8.09 मीटरची सर्वोत्तम उडी मारत चौथ्या फेरीपर्यंत आघाडी टिकवून ठेवली होती. मात्र, जमैकाच्या टेजे गेलने 8.15 मीटरची उडी मारून सुवर्ण पदकावर कब्जा केला. मुरलीला आपल्या पाचव्या प्रयत्नात 7.94 मीटरची उडी मारता आल्याने त्याला अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
MURARALI SREESHANKAR WINS SECOND SILVER AT COMMONWEALTH GAMES!
— The Khel India (@TheKhelIndia) July 29, 2026
- Silver at Birmingham & Glasgow 🥈🥈 pic.twitter.com/40IOx4kiFK
महिलांच्या शॉटपुट फायनलमध्ये भारताची मनप्रीत कौर अगदी थोडक्यात पदकापासून वंचित राहिली. मनप्रीतने 17.49 मीटरची सर्वोत्तम फेकी करत चौथा क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या बहुतांश वेळात ती पदकाच्या शर्यतीत कायम होती. मात्र, अंतिम फेरीत लॉयड्रिशिया कॅमेरूनने 17.87 मीटरचा निर्णायक थ्रो करत कांस्य पदक पटकावले आणि मनप्रीतचे पोडियम फिनिशचे स्वप्न अपूर्ण राहिले.