Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?
Saam TV July 30, 2026 10:45 AM
१ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासासाठी महिलांना एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य होणार असल्याच्या चर्चेमुळे विठ्ठलवाडी एसटी आगारात महिला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. कार्ड नोंदणीसाठी केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने आगारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवस कार्ड तयार करणारी मशीन बंद असल्याने अनेक महिलांना परत जावे लागल्याची तक्रार आहे. तसेच, नोंदणी प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंतच होत असल्याने अनेकांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. १ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जाईल, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी एसटी प्रशासनाने अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार ही धरणांमध्ये गेल्या वर्षी पेक्षा ६ टक्के जास्त पाणीसाठा

सततच्या संतधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चिंता मिटली

खडकवासला १०० टक्के तर पानशेत ९८ टक्के भरले

गेल्या वर्षी आजच्या तारखेला एकूण पाणीसाठा ८८ टक्के होता मात्र यंदा तो ९४ टक्क्यांवर

खडकवासला: १०० टक्के

पानशेत: ९८.३८ टक्के

वरसगाव: ९३.४९ टक्के

टेमघर: ८१.६९ टक्के

एकूण पाणीसाठा: ९४.२२ टक्के

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.