Moong-Rava Bites: खायला टेस्टी, तब्येतीसाठी बेस्ट; मूग आणि रव्यापासून बनवा हाय-प्रोटिन खुसखुशीत बाईट्स!
esakal July 30, 2026 10:45 AM

Crispy-Healthy Moong Bites: धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण काहीतरी झटपट आणि हेल्दी खाण्याच्या शोधात असतो. जर तुम्हाला रोजच्या नाष्टयाचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन,पौष्टिक शोधत असाल, तर मूग आणि रव्यापासून तयार होणारा हा कुरकुरीत आणि उच्च प्रथिनयुक्त (High Protein) नाष्टा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा पदार्थ क्रिस्पि चवीसोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

साहित्य
  • हिरवे मूग - अर्धा कप (४ तास भिजवलेले)

  • पिवळी मूग डाळ - पाव कप (४ तास भिजवलेली)

  • रवा - पाव कप

  • कोथिंबीर - मूठभर

  • हिरव्या मिरच्या - २

  • लसूण पाकळ्या - ३ ते ४

  • मीठ - चवीनुसार

  • पाणी - पाव कप

  • फोडणीसाठी: तेल, मोहरी, पांढरे तीळ आणि कढीपत्ता

Pumpkin Jowar Idli: कमी तेल, भरपूर पोषण! नाश्त्यासाठी झटपट बनवा गरमागरम 'भोपळा-ज्वारी इडली' कृती

- सगळ्यात आधी भिजवलेले हिरवे मूग, पिवळी मूग डाळ, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घ्या.

- त्यात पाव कप पाणी घालून सर्व मिश्रण बारीक वाटून घ्या.

- वाटलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात रवा आणि मीठ मिसळा. मिश्रण काही वेळ तसेच मुरू द्या.

- आता नॉनस्टिक पॅनवर थोडे तेल टाका. पॅनवर या मिश्रणाचे छोटे छोटे बाईट्स (छोटे धिरडे) सोडा.

- मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या.

- शेवटी एका खमंग फोडणी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, पांढरे तीळ आणि कढीपत्ता तडतडवून घ्या. ही खमंग फोडणी तयार वर किंवा पॅनमध्ये कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.

- हा गरमागरम आणि खुसखुशीत नाष्टा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा ताज्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

मुगाचे आरोग्यासाठी होणारे जबरदस्त फायदे
  • प्रथिनांचे भांडार: मूगामध्ये उच्च दर्जाचे प्लांट-बेस्ड प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे स्नायूंच्या बळकटीसाठी उपयुक्त ठरते.

  • पचनक्रिया सुधारते: मूग डाळ पचायला अत्यंत हलकी असते. यातील फायबरमुळे बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या दूर होतात.

  • वजन नियंत्रणात राहते: हा नाष्टा खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

  • मधुमेह आणि हृदयासाठी गुणकारी: मुगामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.