आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३० जुलै २०२६
esakal July 30, 2026 10:45 AM
पंचांग

गुरुवार : आषाढ कृष्ण १, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.१२ सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय सायंकाळी ७.४९, चंद्रास्त सकाळी ६.४७, भारतीय सौर श्रावण ८ शके १९४८.

दिनविशेष

  • २००३ : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वी.

  • २००६ : गेली ३५ वर्षे रेंगाळलेला आणि सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या टिहरी जलविद्युत प्रकल्पातून विजेच्या व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ.

  • २०१२ : लंडन ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाज गगन नारंगने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कामगिरी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.