पिंपरी: ‘‘आम्ही जेवायला बसलो होतो. दोन-तीनच खास खाल्ले आणि भूकंपासारखे हादरे बसले. घाबरून कॅंटीनमधून बाहेर पळायला लागलो. पण, काही क्षणात स्लॅब व पीओपी कोसळले. त्याखाली दाबला गेलो. अकरा तास तसाच पडून होतो. वाचवायला आलेल्यांनी पाणी प्यायला दिले. रात्री दोनच्या सुमारास हॉस्पिटलला आणले. आता बरं वाटतंय, उद्या डिस्चार्ज मिळणार आहे.’’ हा घटनाक्रम सांगितला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील जखमी तरुण कामगार भूषण पाटील यांनी.
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी! अवघ्या १२ तासांत जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढपिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा ढिगारा आठ जुलै रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ढासळला. त्यामुळे कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची तीन मजली प्रशासकीय इमारत कोसळली. त्याखाली दबून नऊ कामगारांचा बळी गेला. पाच जण स्वतः बाहेर आले. नऊ कामगारांना बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले. त्यात कान्हे (ता. मावळ) येथे राहणारा भूषण पाटीलही (वय २४, रा.मूळगाव म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे) याचाही समावेश होता. त्याच्यावर भोसरी इंद्रायणीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी (ता.३०) त्याला घरी सोडणार आहेत. याबाबत डॉक्टरांनी बुधवारी (ता.२९) पत्रकार परिषदेत माहिती दिली.
प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणभूषण पाटील यांच्या डावा पाय व हाताला गंभीर मार लागला आहे. वाणिज्य शाखेची (बी.कॉम) पदवी घेतल्यानंतर त्यांनी ‘एमबीए’ केले. मोशी कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालविणाऱ्या ॲँटोनी लारा कंपनीत नोकरीला लागून पाच-सहा दिवसच झाले होते. पण, दुर्घटना घडली. त्याबाबत भूषण पाटील म्हणाले, ‘‘कामाच्या गडबडीत आम्ही जेवायला वीस मिनिटे उशिरा गेलो. भावेश वाणी माझे सिनियर होते. आम्ही दोघे खालच्या मजल्यावर जाऊन जेवायला बसलो. चार-पाचच घास खाल्ले. तेवढ्यात भूकंप झाल्यासारखे वाटले. सर्व बिल्डिंग हलू लागली. त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही पळालो; पण स्लॅब व पीओपी कोसळले. त्याखाली मी दाबला गेलो. कमरेपासून खाली अडकलो. उठता येत नव्हते. सगळीकडे अंधार होता.
मी समोरचा पीओपीचा पुठ्ठा बाजूला केला. त्यामुळे बाहेरचे थोडे दिसत होते. रात्री काही जण दिसले. त्यांना आवाज दिला. त्यांनी मला पाण्याची बाटली दिली. आधार दिला. पाणी प्यायलो. त्यांनी हळूहळू बाहेर काढले. त्यानंतर हॉस्पिटलला दाखल केले. आता बरे वाटत आहे. पण, डावा पाय व हात अजून दुखतोय. उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. या कठीण प्रसंगी माझी काळजी घेणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.’’
डॉक्टर म्हणाले....‘‘मोशी दुर्घटनेतील जखमी भूषण पाटील व महेश राऊत यांना नऊ जुलै रोजी पहाटे आमच्याकडे दाखल केले होते. दोघांनाही अनेक दुखापती होत्या. प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे ऑर्थोपेडिक्स, प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, न्यूरोसर्जरी, क्रिटिकल केअर, इंटरनल मेडिसिन, नेफ्रोलॉजी आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागातील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. टप्प्याटप्प्याने अनेक शस्त्रक्रिया केल्या. यात वाउंड डिब्राइडमेंट, व्हॅक्यूम-असिस्टेड क्लोजर थेरपी, बायोडिग्रेडेबल टेम्पोरायझिंग मॅट्रिक्सचा वापर करून सॉफ्ट टिश्यू पुनर्बांधणी, डाव्या हाताच्या टेंडनची दुरुस्ती, शरीरात घुसलेले काचेचे तुकडे काढणे, चेहऱ्यावरील जखमांवर उपचार, डोके आणि मानेवरील अनेक जखमा बंद करणे आदींचा समावेश होता. आता दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. पूर्ण बरे होऊन सहा महिन्यांनी ते पुन्हा कामावर जाऊ शकतात,’’ असे उपचार व शस्रक्रिया करणारे डॉ. दीपक पाटील व डॉ. राहुल गागरे यांनी सांगितले.
जखमी महेश राऊत म्हणाले...‘‘मी जेवत असताना अचानक सर्व काही हलू लागले. सुरुवातीला मला भूकंप झाला असे वाटले. काही क्षणांतच कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा भाग माझ्यावर कोसळला आणि मी त्याखाली अडकलो. जवळपास १४ तास मी ढिगाऱ्याखाली होतो. प्रत्येक क्षण हा आशा आणि भीती यांच्यातील संघर्ष होता. बचाव पथकाने मला जिवंत बाहेर काढले. हॉस्पिटलला दाखल केले.
चांगले उपचार झालेत. वेळेवर मिळालेले उपचार, त्यांनी घेतलेली काळजी आणि सततचे प्रोत्साहन यामुळे मला आयुष्याची दुसरी संधी मिळाली आहे. या कठीण काळात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.’’
माझे सासरे कामानिमित्त पुण्यात आले होते. त्यामुळे पतीही इथेच स्थायिक झाले होते; पण त्यांचे निधन झाल्याने मला माहेरी राहावे लागले. भूषणच्या अपघाताबाबत कळले त्याच दिवशी आले. आता त्याची तब्बेत चांगली आहे. उद्या घरी सोडणार आहेत.
- शारदा पाटील, भूषणची आई
डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आमच्या मुलाला जीवदान मिळाले. उद्या ड्रेसिंग करून घरी सोडणार आहेत. पुन्हा बारा दिवसांनी बोलावले आहे. पायाच्या नसा मोकळ्या होऊन रक्तपुरवठा सुरळीत होण्याचे मशिन लावले आहे. ते घरीही देणार आहेत.
- सुनीता मराठे, भूषणची आत्या
NEET Success Story: जिद्दीला यशाची साथ! साताऱ्यातील अथर्व बागलची ‘नीट’मध्ये ६३१ गुणांची दमदार कामगिरी; डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी झेप लहानपणीच पितृछत्र हरपलेभूषणचे आजोबा (मूळगाव मोराणे, जि. धुळे) कामानिमित्त पुण्यात आले होते. इथेच स्थायिक झाले. त्यामुळे वडील अजय पाटीलही लहानाचे मोठे इथे झाले. कंपनीत कामाला होते; पण भूषण सहा वर्षांचा असताना त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यावेळी लहान भाऊ सचिन अवघा सहा दिवसांचा होता. आई शारदा पाटील माहेरी (रा.म्हसदी, ता. साक्री, जि. धुळे) होत्या. तेव्हापासून दोन्ही मुलांसह त्या माहेरी राहिल्या. भूषण यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण म्हसदीमध्ये झाले. त्यानंतर आत्या सुनीता मराठे यांच्याकडे कान्हे फाटा येथे आले. पुण्यात पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि नोकरीला लागले. लहान भाऊ सचिन धुळे येथे संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.