पुणे : पुण्यात रिक्षाने प्रवास करणे आता महाग होणार आहे. रिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मान्य करून त्याचा प्रस्ताव लवकरच प्रादेशिक परिवहन समितीसमोर मांडण्यात येणार आहे. समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी याला मान्यता देताच पुण्यात रिक्षाची भाडेवाढ लागू होईल.
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणासाठी आनंदाची बातमी! अवघ्या १२ तासांत जलसाठ्यात २ टक्क्यांची वाढआखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सीएनजीसह पारंपरिक इंधनाच्या दरात वाढ झाली. त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर होत असल्याचे सांगून रिक्षा संघटनांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे भाडेवाढ करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत परिवहन कार्यालयाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करून पुणे प्रादेशिक परिवहन समितीसमोर मांडला आहे. त्याला येणाऱ्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
असे असतील नवे दरसध्याचे दर : पहिल्या दीड किलोमीटरसाठी २५ रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये.
प्रस्तावित नवे दर : पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये.
प्रवाशांना आर्थिक फटकापुण्यात ‘पीएमपी’च्या बससह लाखो प्रवासी प्रवासासाठी रिक्षांचा आधार घेतात. यामध्ये नोकरदार वर्ग, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांची संख्या मोठी आहे. आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी थेट पाच रुपयांची वाढ आणि पुढील प्रत्येक किलोमीटरमागे तीन रुपयांची वाढ प्रस्तावित आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशाला याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
NEET Success Story: जिद्दीला यशाची साथ! साताऱ्यातील अथर्व बागलची ‘नीट’मध्ये ६३१ गुणांची दमदार कामगिरी; डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी झेप रिक्षा दृष्टिक्षेपातपुण्यातील रिक्षांची संख्या
सुमारे १ लाख ३० हजार
रिक्षातून प्रवासी वाहतूक (दैनंदिन)सुमारे २० लाख