CJP जॉइन करा अन् दर महिन्याला 50 हजार कमवा! असा मेसेज सगळीकडे का होतोय व्हायरल? यामागचा स्कॅम पाहून बसेल धक्का
esakal July 30, 2026 04:45 PM

सोशल मीडियावर एक नवीन प्रकारची फसवणूक सुरू झाली आहे. 'कोकरोच जनता पार्टी' (CJP) च्या नावाने लोकांना आकर्षित करून त्यांची फसवणूक केली जात आहे. या फसवणुकीत दरमहा ५०,००० रुपये कमावण्याचे आमिष दाखवले जाते.

कशी चालते ही फसवणूक?
फसवणूक करणारे बनावट फेसबुक खाती तयार करतात. त्यात CJP मध्ये सामील होऊन ज्येष्ठ सदस्य बनण्याचे आमिष दाखवले जाते. लोकांना QR कोड किंवा लिंक देऊन ऑनलाइन नोंदणी करण्यास सांगितले जाते. काही जणांना बँक डिटेल्स किंवा पैसे मागितले जातात.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, ही फसवणूक पाकिस्तानस्थित सायबर गुन्हेगार चालवत आहेत. ते CJP च्या नावाचा गैरवापर करून तरुणांना लक्ष्य करत आहेत.

तरुणांची फसवणूक
अनेक तरुण बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळे या आमिषाला बळी पडत आहेत. 'आळशी आणि बेरोजगारांचा आवाज' अशा घोषणा वापरून लोकांना आकर्षित केले जाते. मात्र, ही सर्व जाहिरात खोटी असल्याचे समोर आले आहे.

Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेला वेग! 2027 च्या अंतराळ मोहिमेसाठी इस्रोची मोठी तयारी, अंतराळवीर अवकाशात झेप घ्यायला सज्ज काय करावे?
  • CJP किंवा कोणत्याही संघटनेच्या नावाने येणाऱ्या पैसे कमावण्याच्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका.

  • अज्ञात लिंक्स किंवा QR कोड स्कॅन करू नका.

  • बँक डिटेल्स किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

  • संशयास्पद पोस्ट आली तर पोलिसांना किंवा सायबर सेलला रिपोर्ट करा.

सरकार आणि सुरक्षा यंत्रणा या प्रकारच्या सायबर फसवणुकींवर लक्ष ठेवून आहेत. तरुणांनी जागरूक राहून अशा फसवणुकींपासून स्वतःचे संरक्षण करावे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.