बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
मिकी घई, एबीपी माझा, पुणे July 30, 2026 06:13 PM

पुणे: पुण्यातील शिक्रापूर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा त्याच्याच सोबत राहणाऱ्या रूममेटचा (Pune Crime News) गळा दाबून निर्घृण खून केला. इतकंच नव्हे तर, हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने आपल्या पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून निर्जन झुडपात (Pune Crime News) फेकून दिला. शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या काही तासांत या हत्याकांडाचा उलगडा केला असून आरोपी पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime News)

Pune Crime News:  नेमकी काय आहे घटना?

ही थरारक घटना २४ ते २६ जुलै दरम्यान करंजेनगर येथे घडली. गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर (वय २४, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. २६ जुलै रोजी दुपारी करंजेनगर येथील एका मोकळ्या मैदानावरील झुडपात पोत्यात भरलेला एक अनोळखी मृतदेह (Pune Crime News) आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ (Pune Crime News) उडाली. मृतदेहाची ओळख पटवणे सुरुवातीला कठीण होते; मात्र शिक्रापूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवत सोशल मीडियावर छायाचित्रे प्रसारित केली आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. त्यावरून मृत तरुण हा गौरव वायकर असल्याचे निष्पन्न झाले.(Pune Crime News)

Pune Crime News:  असा उलगडला हत्येचा बनाव

तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, गौरव हा करंजेनगर येथे मुकेश विठ्ठल सोनवणे (वय १९) आणि त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय १९) यांच्यासोबत एकाच रूममध्ये राहत होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात जोरदार वाद सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ संशयित मुकेश आणि जान्हवी या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपी मुकेशने गौरवचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा लपवण्यासाठी त्याची पत्नी जान्हवी हिने मृतदेह पोत्यात भरण्यास व तो झुडपात नेऊन फेकण्यास मदत केली असल्याचे निष्पन्न झाले.(Pune Crime News)

Pune Crime News: दोन्ही आरोपींना अटक

याप्रकरणी मृत गौरवची आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना (मुकेश सोनवणे आणि जान्हवी पाटोळे) अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.